चीन आणि भारतीय वस्तुंमधील फरक असा ओळखा

चीनी मालावरील विक्रीवरील बंदी निर्बंध आणखी कडक 

Updated: Jul 29, 2020, 09:38 PM IST
चीन आणि भारतीय वस्तुंमधील फरक असा ओळखा title=

नवी दिल्ली : मोदी सरकारने चीनी मालावरील विक्रीवरील बंदी निर्बंध आणखी कडक केलेयत. खराब आणि टाकाऊ चीनी वस्तुंविरोधात मोर्चा उघडण्यात आलाय. त्यामुळे भारतात आयात होणाऱ्या चीनी वस्तुंवर सरकारची BIS द्वारे बारीक नजर असणार आहे. 

भारतीयांची परदेशातून येणाऱ्या हलक्या दर्जाच्या वस्तुंपासून सुटका व्हावी यासाठी  कॉमर्स मिनिस्ट्रीने नियम बनवले आहेत. यामध्ये ३७१ वस्तू चिन्हीत केल्या आहेत. यामध्ये चीनी वस्तू सर्वाधिक आहेत. चीनकडून भारताला खेळण्यापासून इलेक्ट्रीक सामानापर्यंत सर्व वस्तू आयात होतात. 

चीनी वस्तू स्वस्त असतात पण त्यांची क्वालीटी चांगली नसते असे व्यावसायिक सांगतात. भारतात आयात होणाऱ्या इलेक्ट्रीक वस्तू, फार्मास्युटीकल्स, केमिकल्स आणि स्टील सहीत खेळण्यांसह अनेक आयात वस्तूंवर नजर ठेवलीय. 

भारत सरकारने यावर्षी फेब्रुवारीमध्ये खेळणी गुणवत्ता नियंत्रण नियम जाहीर केले. हे सप्टेंबर २०२० पासून लागू होतील. खेळण्यांवर भारतीय मानक चिन्ह BIS चे मार्क असेल असेल. यासंदर्भात २५ फेब्रुवारीला आदेश जाहीर करण्यात आलाय.

कॉमर्स मिनिस्ट्री अंतर्गत येणाऱ्या उद्योग संवर्धन आणि आंतरिक व्यापार विभागाद्वारे हा निर्णय घेण्यात आलायं. भारतीय वस्तूंवर हा लोगो असल्याने नागरिकांना मेड इन इंडीया वस्तू ओळखता येणं सोपं होणार आहे. असा लोगो नसलेल्या परदेशी किंवा विशेषत: चीनी वस्तू ओळखणे सोपे होईल. चीनी व्यापारासाठी ही खूप मोठी चपराक आहे.