मध्य प्रदेश : कोरोनामुक्त भारत करण्यासाठी सरकारपासून जनतेपर्यंत सर्वजण आपापल्या परिने प्रयत्न करित आहेत. सरकारने ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. बहुसंख्य जनता ही लॉकडाऊनचे पालन करताना दिसत आहे. पोलीस, सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी हे दिवसरात्र एक करुन काम करत आहेत. असे असताना काही नागरिक शासनाने बनवलेले हे नियम धाब्यावर बसवताना दिसत आहेत. अशासांठी पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या रुपात येऊन त्यांना समज देत आहेत. मध्य प्रदेशमध्ये एक पोलीस कर्मचारी यमदूत बनून आला असून तो जनतेत जनजागृती करत आहे.
मध्य प्रदेशमधील शहरांमध्ये पोलिसांच्या गाडीवर एक यमराज पाहायला मिळत आहे. हा यमराज जनतेला कोरोनामुळे मरणाची भीती दाखवत आहे. कोरोनाचे संकट असताना अनेकजण विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहेत. वारंवार शिक्षा करुनही ही मंडळी ऐकत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे पोलीस विविध क्लृप्त्या अवलंबत आहेत. महाराष्ट्रात एका पोलिसाने कविता गाऊन जनजागृती केली होती. आता मध्य प्रदेशातील पोलीस कॉन्स्टेबर यमराज बनून प्रबोधन करत आहे.
#WATCH Madhya Pradesh: A Police Constable in Indore dressed up as 'Yamraj' to spread awareness on #Coronavirus in the city. He is appealing to people to "stay at home". (17.4.2020) pic.twitter.com/1sfBaiYATF
— ANI (@ANI) April 17, 2020
कोणीही घरातून बाहेर पडू नका. कोणी व्यक्ती बाहेर पडला तर तो कोरोना संक्रमित होईल. आणि त्या व्यक्तीला उपचार मिळाले नाहीत तर त्या व्यक्तीला माझ्यासोबत यावे लागेल. हा हा हा हा.. हम है यम...यम है हम ! असे