सरकारी व्यवस्थेचा अमानवीय चेहरा ; Ambulance न मिळाल्याने बाईकच्या डिक्कीमध्ये न्यावा लागला लेकाचा मृतदेह

बाईकच्या डिक्कीमध्ये मृतदेह पाहून लोकांना धक्का बसला

Updated: Oct 20, 2022, 11:42 AM IST
सरकारी व्यवस्थेचा अमानवीय चेहरा ; Ambulance न मिळाल्याने बाईकच्या डिक्कीमध्ये न्यावा लागला लेकाचा मृतदेह title=
(फोटो सौजन्य - सोशल मीडियावरुन साभार)

मध्य प्रदेशात (Madhya pradesh) आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अमानवीय चेहरा समोर आला आहे. नवजात बालकाचा (newborn child) मृतदेह नेण्यासाठी वडिलांना रुग्णवाहिकाही (ambulance) मिळू न शकल्याने त्यांना बाईकच्या (Bike) डिक्कीमध्ये मृतदेह ठेवावा लागला आहे. मध्ये प्रदेश जिल्हा रुग्णालयातून गर्भवती (pregnant) महिलेला तपासणीसाठी दवाखान्यात (Hospital) पाठवण्यात आले. त्याचवेळी प्रसूतीनंतर महिलेने मृत मुलाला जन्म दिला आणि तिला रुग्णवाहिकाही मिळाली नाही. यामुळे महिलेच्या पतीने मंगळवारी आपल्या नवजात बालकाचा मृतदेह बाईकच्या (Bike) डिक्कीमध्ये ठेवत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. पिशवीत मृतदेह पाहून लोकांना धक्का बसला. यानंतर जेव्हा त्या व्यक्तीने घटनाक्रम सांगितला तेव्हा लोकांचे डोळे भरून आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. (Madhya pradesh body of new born baby father reached the collectorate with the bike trunk)

उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) सोनभद्र जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व्यक्तीने यांनी सांगितले की त्याच्या पत्नीची प्रसूती होणार होती. त्यासाठी त्याने सिंगरौली जिल्हा रुग्णालयात गाठले. तिथल्या एका डॉक्टरने त्याच्या पत्नीला प्रसूतीपूर्वी काही चाचण्यांसाठी क्लिनिकमध्ये पाठवले. तिथे त्यासाठी त्याच्याकडून पाच हजार रुपये घेण्यात आले. तपासानंतर केल्यानंतर ते पत्नीला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. तिथे सोमवारी पत्नीने मृत मुलाला जन्म दिला. पत्नी आणि मृत मुलाला घरी नेण्यासाठी त्यांनी अॅम्ब्युलन्स मागितली. मात्र रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली नाही.

मूल गमावल्याच्या दु:खाने आणि कर्मचाऱ्यांच्या अमानुष वागणुकीने व्यथित झालेल्या वडिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. बाईकच्या डिक्कीतून पिशवीतून त्यांनी मुलाचा मृतदेह काढताच एकच खळबळ उडाली. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला.  या घटनेबाबत सिंगरौलीचे जिल्हाधिकारी राजीव रंजन मीना यांनी तात्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. "आरोपांची चौकशी करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी नेतृत्वाखाली एक पथक तयार केले जाईल.  तसेच आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल," असे राजीव रंजन म्हणाले.