Crime News : सोशल मीडियावर झालेली ओळख कित्येकांना महागात पडलेल्या घटना आपण पाहिल्या आहेत. अशातच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. फेसबुकवर ओळख झालेल्या तृतीयपंथीची एका व्यक्तीने हत्या केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आरोपी नूर मोहम्मदने क्रूरपणे तृतीयपंथी मोहसिन उर्फ झोयाच्या शरीराचे दोन तुकडे केले.
नेमकं काय आहे प्रकरण?
जोया आणि नूर मोहम्मदची फेसबुकवर ओळख झाली होती. दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले आणि फोनवर बोलू लागले. त्या काळात मोहम्मदची पत्नी गरोदर असल्याने माहेरी गेली होती. त्याचे वडिलही बाहेर गावी गेले होते. त्यावेळी मोहम्मदने रात्री जोयाला फोन करत घरी बोलावून घेतलं. याआधी दोघे कधीही एकमेकांना भेटले नव्हते.
झोया रात्री घरी गेली तेव्हा मोहम्मद तिच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकू लागला. दोघांमध्ये रात्री मोठा वाद होतो त्यावेळी संतापलेला मोहम्मद जोयाच्या डोक्यात वार करतो आणि तिला जागीच खल्लास करतो. त्यानंतर धारदार शस्त्राने तिच्या शरीराचे दोन तुकडे करतो. अर्धा भाग हा बायपासवर फेकून देतो आणि दुसरा भाग हा घरातील बेडमध्ये लपवतो.
असा झाला उलगडा -
पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासतात, त्यानंतर मृत जोयाच्या पायाला बांधलेल्या एका गोष्टीवरून नातेवाईक ओळख पटवतात. त्यानंतर पोलीस मोहम्मदच्या घरी पोहोचतात. तेव्हा 3 दिवसांपासून मोहम्मद हा बेपत्ता असतो. पोलीस तपास करतात तेव्हा नूर मोहम्मद हा इंदोरच्या परिसरात त्याला अटक करतात.
अटक झाल्यानंतर पोलीस मोहम्मदची चौकशी करतात. चौकशीमध्ये तो आपला गुन्हा कबूल करतो. ही घटना मध्य प्रदेशातील इंदूर शहरातील आहे.