मुलीला पोटाला लावून कर्तव्य बजावणारी ही महिला पोलीस अधिकारी कोण?

महिला पोलीस अधिकाऱ्याने भरउन्हात चिमुकलीला पोटाशी धरून बजावलं कर्तव्य... या आईला आणि महिला पोलीस अधिकाऱ्याला कडक सॅल्युट तर झालाच पाहिजे!

Updated: Oct 20, 2021, 10:49 PM IST
मुलीला पोटाला लावून कर्तव्य बजावणारी ही महिला पोलीस अधिकारी कोण? title=

आलीराजपूर: कर्तव्य मोठं की आपलं पोटचं बाळ हा प्रश्न जर तुम्ही देशसेवा करणाऱ्यांना विचारला तर अर्थातच उत्तर येतं ते आधी मातृभूमी आणि नंतर कुटुंब. महिला पोलिसाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या पोलीस महिलेचं कौतुक मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील केलं आहे. त्यांनी या महिलेसोबत फोटो ट्वीट करत तिचं कौतुक केलं आहे. 

या पोलीस महिलेनं आपलं कर्तव्य आणि बाळ दोन्ही एकाचवेळी किती योग्य पद्धतीनं सांभाळं आहे ते यामधून दिसत आहे. आपल्या कर्तव्याची जाणीव आणि ते पूर्ण करण्यासाठी कोणतीही सबब न देता तिने केलेलं हे बलिदान फार मोठं आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकता की या पोलीस महिलेनं आपल्या चिमुकल्याला बेल्टच्या मदतीनं पोटाशी बांधलं आहे. ही महिला भरउन्हात कोणतंही कारण न देता चिमुकल्याला पोटाशी धरून आपलं कर्तव्य बजावत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार डीएसपीच्या कुटुंबात सध्या या चिमुकलीला सांभाळण्यासाठी कोणी नव्हतं. त्यामुळे महिला पोलीस अधिकाऱ्याने झोड्राड गावातील हेलिपॅडवर ड्युटीवर असताना आपल्या चिमुकलीला घेऊन तिथे आपलं कर्तव्य बजावलं.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान जेव्हा तिथून जात होते तेव्हा त्यांची नजर डीएसपी मोनिका सिंग यांच्यावर पडली. मोनिका या त्यांच्या मुलीला पोटाशी बांधून कर्तव्य निभावत होत्या. त्यांनी चिमुकलीला हातात घेतलं आणि  मोनिका यांच्या कामाचं कौतुक केलं. 

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या दौऱ्यानिमित्त मोनिका यांची विशेष ड्युटी लागली होती. 2 दिवसांसाठी त्यांची ड्युटी लावण्यात आली होती. यावेळी घरी मुलीकडे पाहण्यासाठी कोणी नसल्याने आपल्यासोबत त्या आपल्या मुलीला कडेवर घेऊन ड्युटी करत होत्या. एकीकडे आई आणि दुसरीकडे कर्तव्यदक्ष अधिकारी अशा दोन्ही भूमिका त्या एकाच वेळी निभावताना दिसल्या.