मुंबई : जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा अनेकदा तुम्हाला गरमागरम मॅगी खाण्याची इच्छा होते. इतकंच नाही तर काही बनवायचा कंटाळा आला तरी मॅगी बनवून पोट भरता येतं. शाळा-कॉलेजची मुलंही सकाळच्या नाश्त्यात आणि रात्रीच्या जेवणात मॅगी खाऊ शकतात. त्याचबरोबर जे बाहेर फिरायला जातात, त्यांना रेस्टॉरंटमध्ये मॅगी खाण्याची ऑर्डर देतात.
मॅगीवर बरेच प्रयोग झाले आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या न्यूडल्सचा व्हिडीयो तुम्ही पाहिलात का? जर तुम्ही हा व्हिडीयो पाहिला असेल तर कदाचित यापुढे तुम्ही कधीच न्यूडल्स खाणार नाही.
काहींना साधं मॅगी खायला आवडतं तर काहींना त्यामध्ये व्हरायटी आवडते. काही लोकांना एग मॅगी तर काहींना नॉनव्हेज मॅगी खायला आवडते. गेल्या काही वर्षांत लोकांनी मॅगीचे अनेक प्रयोग करायला सुरुवात झाली आहे. आपली चव बदलण्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करणं चांगलं आहे.
बहुतेकांच्या आवडत्या मॅगीसह विचित्र कॉम्बिनेशन करणं कोणालाही आवडत नाही. असाच काहीसा प्रकार व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत दिसला, जेव्हा मॅगी पेस्ट्रीसोबत बनवली गेली. हा व्हिडीयो पाहून अनेकांच्या कपाळाला आठ्या पडल्या.
एका व्हायरल व्हिडीयोमध्ये मॅगी फ्रायपॅनमध्ये पेस्ट्रीसह तयार केली गेलीये. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रथम व्यक्तीने पॅनमध्ये कांदा, मिरची आणि तेल टाकलं. तवा गरम होताच कोणीतरी त्यात पेस्ट्री टाकली आणि पाणी घालून उकळली. यानंतर त्यामध्ये मॅगी टाकली आणि सोबत मॅगी मसालाही मिसळला.
दरम्यान हा व्हिडीयो इथे संपला नाही. ही पेस्ट्री मॅगीच्या वर पेस्ट्रीचा काही भाग टाकून सर्व्ह केली गेलीये. आवडत्या मॅगीसोबत केलेल्या या प्रयोगावर अनेकांनी संताप व्यक्त केलाय. कदाचित तुम्हालाही हा व्हिडीयो पाहून राग येऊ शकतो.