Jammu Kashmir #MahaShivratri : पांडवांनी एका रात्रीत उभारलेलं 'दाता शिवमंदिर' पाहिलं?

दहशतवादाचं सावट असतानाही.... 

Updated: Feb 21, 2020, 12:35 PM IST
Jammu Kashmir #MahaShivratri : पांडवांनी एका रात्रीत उभारलेलं 'दाता शिवमंदिर' पाहिलं?  title=
Jammu Kashmir : पांडवांनी एका रात्रीत उभारलेलं 'दाता शिवमंदिर' पाहिलं?

श्रीनगर : सारा देश महाशिवरात्रीच्या  #MahaShivratri उतासाहात रंगलेला असतानाच पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्येही याच उत्सवाची झलक पाहायला मिळत आहे. देशाच्या सीमेनजीक असणाऱ्या जम्मू-काश्मीर JAMMU KASHMIR येथील उरी URI येथे असणारं एक अतीव पुरातन मंदीर अनेकांच्या श्रद्धास्थानी आहे. नेहमीचं दहशतीचं सावट, कट्टरतावाद्यांची कटकारस्थानं, वारंवार होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन अशा वातावरणातही उरीतील हे शिवमंदिर घट्ट पाय रोवून उभं आहे. ते म्हणजे एका अदृश्य शक्तिच्या बळावर. 

बीएसएफच्या सुरक्षा कवचात असणारं हे मंदिर एका अर्थी कोणासाठी आशेचा किरण आहे, तर कोणासाठी शांततेचं प्रतिक. हे मंदिर 'दाता मंदिर' या नावानेही ओळखलं जातं. अनेक पुराणकथांमध्ये ज्याप्रमाणे मंदिरांचा उल्लेख असतो, त्याचप्रमाणे या मंदिराच्या रचनेत पांडवांचं योगदान असल्याचं म्हटलं जातं.  

उरी येथे तब्बल २ हजार वर्षांपूर्वी पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर उभारण्यात आल्याचं सांगण्यात येतं. पाच पांडवांपैकी एक असणारा भीम, स्वत: या मंदिरात असणआऱ्या शिवलिंगावर जलाभिषेक करत होता असंही सांगण्यात येतं. निसर्गाच्या अगाध लीला आणि जाहक वास्तवाच्या कुशीत असणारं हे मंदिर इथल्या नागरिकांच्या श्रद्धेचा भाग. 

मंदिरातील शिवलिंगावर थेट झेलम नदीच्याच पाण्याने अभिषेक व्हायचा असंही म्हटलं जातं. दहशतवादी हल्ला होवो, तणावाचं वातावरण असो किंवा मग कोणतंही संकट येवो, दाता मंदिरातील पूजा कधीची चुकत नाही.  सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या संरक्षणामुळे मंदिराला आणि भाविकांना कधीही कोणत्याच संकटांचा सामना कराला लागलेला नाही, असं मंदिरातील पुजारी सांगतात. 

 #MahaShivratri : बारा ज्योतिर्लिंग ठिकाणी भाविकांचा ओघ

हे मंदिर म्हणजे हिंदू- मुस्लिम ऐक्याचं भक्तिमय प्रतिक आहे.  दहशतवादाच्या छायेखाली असणाऱ्या काश्मिरी नागरिकांचा आधार आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देणारं हे प्राचीन मंदिर म्हणजे सलोखा आणि आणि एकोप्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे हे खरं.