महाराष्ट्राने भीतीला मारलं, ही परिवर्तनाची सुरूवात - संजय राऊत

शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सत्तासंघर्षाचा दशावतार अगदी ५ मिनिटात मांडला आहे. 

Updated: Dec 10, 2019, 12:42 AM IST
महाराष्ट्राने भीतीला मारलं, ही परिवर्तनाची सुरूवात - संजय राऊत

नवी दिल्ली : शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सत्तासंघर्षाचा दशावतार अगदी ५ मिनिटात मांडला आहे. दिल्लीत खासदारांशी बोलताना संजय राऊत यांनी ३६ दिवसांचा सत्तासंघर्षाचा थरार सांगितला. 'महाराष्ट्राने भितीला मारलं, आता या २ ते ४ लोकांची जी भीती होती, ती आता नाही राहिली, ती मारली महाराष्ट्राने', असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

तसेच 'महाराष्ट्रमध्ये जे परिवर्तन झालं, त्या परिवाराने देशाला दिशा दिली आहे. महाराष्ट्रानंतर आता देशात अनेक ठिकाणी परिवर्तन होईल,महाराष्ट्राने भीतीला मारलं, ही एक परिवर्तनाची सुरूवात असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अजित पवार धोका देणं शक्य नव्हतं, त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो, देवेंद्र फडणवीस यांना फाजिल आत्मविश्वास नडला, शरद पवार यांच्याविषयी कुणी काहीही म्हणू देत पण, माझा शरद पवार यांच्यावर आधीपासून कमालीचा विश्वास आहे. शरदपवार यांनी ठरवलं तर, ते काहीही होवू दे करून दाखवतात, ते उदयनराजे यांनाही त्यांनी दाखवून दिलं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.