15 दिवसांपेक्षा कमी दिवसात नफा कमवा, सरकारी आणि खासगी बँका तुम्हाला देत आहे ही संधी

 कमी कालावधीत चांगले पैस कमविण्याची संधी  सरकारी आणि खासगी बँका तुम्हाला देत आहेत. ही संधी तुम्ही सोडू नका. 

Updated: Jul 9, 2021, 07:43 AM IST
15 दिवसांपेक्षा कमी दिवसात नफा कमवा,  सरकारी आणि खासगी बँका तुम्हाला देत आहे ही संधी   title=

मुंबई : प्रत्येकाला पैसे कमवायचे आहेत. मात्र, कमी कालावधीत चांगले पैस कमविण्याची संधी  सरकारी आणि खासगी बँका तुम्हाला देत आहेत. ही संधी तुम्ही सोडू नका. कारण अल्पावधीत तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? मात्र, हे शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला एवढंच करावे लागेल. चला जाणून घेऊन कसे ते?

तुम्ही 15 दिवसांपेक्षा कमी दिवसात नफा कमवा. तो देखील 7 ते 14 दिवसांत. देशातील सरकारी तसेच खासगी बँका तुम्हाला ही संधी देत आहे. तुम्ही बँक एफडीमध्ये (Bank Fixed Deposit)  पैसे गुंतवणूक 7 ते 14 दिवसांत चांगले पैसे मिळवू शकता. या बँकामध्ये या कालावधीसाठी वेगवेगळे व्याजदर मिळत आहेत.

SBI पासून PNB, ICICI आणि HDFC या बँकांमध्ये तुम्ही अत्यंत कमी कालावधीसाठी देखील एफडी करू शकता. या बँकांत तुम्हाला सात दिवसांत कोणत्या बँकेतून तुम्हाला किती व्याज मिळेल, ते पाहा.

1. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) - देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया 7 दिवसांच्या एफडीसाठी 2.90 टक्के दराने व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी  3.40 दराने व्याज देत आहे.

2. बँक ऑफ बडोदा मध्ये (BOB) - 7 दिवसांच्या एफडीवर 2.80 टक्के दराने व्याजदर मिळतो आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 3.30 टक्के आहे.

3. आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) - 7 ते 14 दिवसांच्या एफडीसाठी 2.50 टक्के दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 2.50 दराने एफडीवर व्याज आहे.

4. एचडीएफसी बँकमध्ये  (HDFC Bank) - 7 ते 14 दिवसांच्या एफडीसाठी 2.50 टक्के दराने तर ज्येष्ठ नागरिकांना 3.00 दराने एफडीवर व्याज देत आहे.

5. बँक ऑफ इंडियामध्ये  (BOI) 7 दिवसांच्या एफडीवर 03.00 टक्के दराने व्याजदर असून ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 3.50 टक्के आहे.

6. पीएनबी (PNB) आणि पंजाब अँड सिंध बँकेमध्ये सामान्यांसाठी  3 टक्के दराने एफडीवर व्याज असून या दोन्ही बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के दराने FD वर व्याज देण्यात येत आहे.

7. यूनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) - या बँकेत 7 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 3 टक्के दराने व्याज मिळत आहे.

8. बंधन बँक (Bandhan Bank) - 7 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 3 टक्के दराने व्याज मिळते आहे. तर याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना 3.75 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे.

9. येस बँक (Yes Bank) - या बँकेत 7 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 3.25 टक्के दराने व्याज मिळते आहे. तर याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना 3.75 टक्के दराने व्याज आहे.

10. डीसीबी बँक (DCB Bank) - डीसीबी बँकेत सात दिवसांच्या एफडीवर 4.55 टक्के दराने व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी याठिकाणी 5.05 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे.

11. इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank) -  IOBमध्ये 7 दिवसांच्या एफडीवर 3.40 दराने व्याज असून ज्येष्ठ नागरिकांसाठी याठिकाणी 3.90 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे.