मुंबई : State Bank of India : आज SBI बँकेची सेवा दुपारी 1 ते 4.30 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे यावेळेत कोणतेही काम होणार नाही, असे स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. याबाबत बँकेने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
अनेक बँकिंग सेवा बंद राहणार असल्याने ग्राहकांची गैरसोय होणार आहे. मात्र, ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट केले आहे. दुपारी 1 ते 4.30 वाजेपर्यंत अनेक बँकिंग सेवा बंद राहणार आहे.
SBI ही देशातील एकमेव अशी बँक आहे ज्याचे सर्वाधिक ग्राहक आहेत. त्याच्या शाखा जवळपास प्रत्येक राज्यात आहेत. SBI वेळोवेळी खातेदारांच्या पैशाचे रक्षण करण्यासाठी पावले उचलत असते. दरम्यान, SBI ने ट्विट करून माहिती दिली आहे की, "आज दुपारी 1:00 ते 4:30 पर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अनेक बँकिंग सेवा ठप्प राहतील."
वार्षिक क्लोजिंग उपक्रम लक्षात घेऊन या सेवा बंद केल्या जात आहेत. यादरम्यान INB, Yono, Yono Lite, Yono Business, UPI या सेवा ठप्प राहतील.