मराठा लाईट इन्फन्ट्रीची 250 वर्ष पूर्ण, माऊंट कूनवर चढाई

माऊंड कून हे शिखर चढाईसाठी अतिशय खडतर समजलं जातं

Updated: Sep 11, 2018, 05:45 PM IST
मराठा लाईट इन्फन्ट्रीची 250 वर्ष पूर्ण, माऊंट कूनवर चढाई

नवी दिल्ली : गौरवशाली इतिहास असलेली इंडियन आर्मीची मराठा लाईट इन्फन्ट्री आपली २५० वर्षे पूर्ण करतेय. त्यानिमित्त कारगिल भागातलं सर्वात उंच शिखर माऊंट कूनवर मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या तुकडीने यशस्वी चढाई केली. १७ जुलैला या अभियानाला सुरूवात झाली. या तुकडीतल्या वीरांचा सन्मान लेफ्टनंट जनरल पीजेएस पण्णू यांच्या हस्ते करण्यात आला. माऊंड कून हे शिखर चढाईसाठी अतिशय खडतर समजलं जातं.