मुथूट फायनान्सचे अध्यक्ष एम.जी.जॉर्ज मुथूट यांचे निधन

 मुथूट फायनान्सचे अध्यक्ष एम.जी.जॉर्ज मुथूट यांचे शुक्रवारी सायंकाळी नवी दिल्ली येथील निवासस्थानी निधन झाले

Updated: Mar 6, 2021, 08:24 AM IST
 मुथूट फायनान्सचे अध्यक्ष एम.जी.जॉर्ज मुथूट यांचे निधन title=

कोची  : मुथूट फायनान्सचे अध्यक्ष एम.जी.जॉर्ज मुथूट यांचे शुक्रवारी सायंकाळी नवी दिल्ली येथील निवासस्थानी निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्या कुटूंबांतील सदस्यांनी ही माहिती  दिली आहे. मुथूट फायनान्स ही भारतातील सर्वांत मोठी गैर-वित्तीय संस्था आहे. 

मुथूट बऱ्याच कालावधीपासून दिल्लीत राहत होते. 20 पेक्षा अधिक क्षेत्रांमध्ये मुथूट यांचा व्यवसाय सुरू आहे. या व्यवसाय समुहाचे मुख्यालय कोचीमध्ये (केरळ) आहे. मुथूट यांचा व्यवसाय समुह सोने, बॉंड्स, रिअल इस्टेट, रुग्णालय तसेच शिक्षण क्षेत्रात काम करतो.

मुथूट यांच्या कुटूंबात पत्नी सारा आणि दोन मुले आहे.