शहीद जवानाला आईकडून अखेरचा निरोप; यासाठी वाघिणीचं काळीज लागतं...

जवानाचं पार्थिव त्यांच्या मुळ गावी पोहोचताच ....

Updated: Sep 24, 2021, 11:15 AM IST
शहीद जवानाला आईकडून अखेरचा निरोप; यासाठी वाघिणीचं काळीज लागतं...  title=
छाया सौजन्य - सोशल मीडिया

मुंबई : जम्मू काश्मीरमधील शोपियाँ येथे शोधमोहिमेदरम्यान, वीजेचा धक्का बसल्यामुळं अखेरचा श्वास घेतलेल्या शहीद जवान जयपाल गिल याचं पार्थिव मंगळवारी त्यांच्या गावी आणण्यात आलं. ते हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील हंसेवाला गावातील राहणारे होते. शहीद जवानाचं पार्थिव त्यांच्या मुळ गावी पोहोचताच तिथं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येनं लोकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. (martyred-jaipal-gill-mother-tribute-last-journey-people-are-getting-emotional)

देशाचं रक्षण करण्यासाठी सैन्यदलात सहभागी झालेल्या जवानाला आलेलं मरण पाहता साऱ्यांच्याच काळजाला पिळ बसला. यावेळी आयएएस अधिकारी परवीन कासवान यांनी त्या क्षणांचे फोटो शेअर केले. हे तेच क्षण होते, ज्यावेळी जयपाल गिल यांच्या पार्थिवापाशी त्यांची आई आली होती. 

आईनं यावेळी आपल्या पोटच्या मुलाला अखेरचा निरोप देताना त्याच्या कपाळी तुपाटा टीळा लावला आणि सोबत कनवटीला असणारी पाचशे रुपयांची नोटही ठेवली. मुलाला अखेरच्या क्षणी डोळे भरुन पाहताना या मातेच्या मनात नेमकं काय सुरु असेल याची कल्पनाही केली असता थरकाप उडत आहे. 

आपल्या मुलानं देशसेवेदरम्यानच प्राण गमावले आहेत. त्यामुळं त्याच्या कामगिरीचा आपल्याला गर्वच वाटतो अशीच भावना जयपाल गिल यांच्या आईनं व्यक्त केली. अखेरच्या वेळी दोन - तीन दिवसांपूर्वीत या वीरमातेनं मुलाशी संवाद साधला होता. वाघाचं काळीज असणाऱ्या या मातेला सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी कडक सॅल्युट ठोकला आहे.