नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर राज्यात शांतता कायम राहावी म्हणून सरकारकडून करण्यात आलेल्या उपाय योजनांचं मायावतींनी समर्थन केलं आहे. मायावती यांनी काश्मीर दौऱ्यावर जाण्यासाठी हट्ट करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना सल्ला दिला आहे की, शांतता कायम होईपर्यंत नेत्यांनी संयम ठेवायला पाहिजे. 'परवानगी न घेता काँग्रेस आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी काश्मीरमध्ये जावू नये.'
मायावती यांनी म्हटलं की, 'बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर नेहमी देशात समानता, एकता आणि अखंडतेच्या बाजुने राहिले आहेत. जम्मू-काश्मीर राज्यात वेगळा अनुच्छेद-370 च्या समर्थनात ते नव्हते. त्यामुळे बसपाने संसदेत याचं समर्थन केलं.'
सुप्रीम कोर्टाच्या मताचं समर्थन करत मायावतींनी म्हटलं की, 'देशात संविधान लागू झाल्यानंतर 69 वर्षानंतर अनुच्छेद 370 हटवल्य़ानंतर येथे परिस्थिती सामान्य होण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे थोडा संयम ठेवला पाहिजे आणि माननीन कोर्टाने देखील हेच म्हटलं आहे.'