From 1 BHK To Net Worth of Rs 100462260000 Crore: गुजरातमधील हिऱ्यांची सर्वात मोठी बाजारपेठ आणि भारताची डायमंड कॅपिटल अशी ओळख असलेल्या सुरत शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्तीकडे किती संपत्ती आहे तुम्हाला ठाऊक आहे का? या व्यक्तीची एकूण संपत्ती 100462260000 कोटी रुपये इतकी आहे. या व्यक्तीचं नाव आहे अश्विन देसाई! ते एथर इंडस्ट्रीजचे मालक आहेत. देसाई यांच्या खालोखाल सर्वाधिक संत्तीत असलेल्या लोकांच्या यादीत असलेल्या व्यक्तीकडे 9700 कोटींची संपत्ती आहे. दुसऱ्या क्रमांकावरील व्यक्तीचं नाव आहे फारुख जी पटेल. फारुख हे के. पी. ग्रुपचे प्रमुख आहे. या ठिकाणी असलेली एथर इंडस्ट्रीज ही कंपनी तुम्ही ओळखता ती इलेक्ट्रीक वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपनी नसून त्यापेक्षाही जुनी कंपनी आहे. ही एथर कंपनी रसायन उद्योग क्षेत्रातील आहे तर के. पी. ग्रुप कंपनी हरित ऊर्जा क्षेत्रात काम करते.
सुरतमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या स्थानी सुरतमधील निरज चौक्सी यांचा समावेश आहे. ते एन. जे. इंडिया इनव्हेसमेंटचे मालक असून त्यांच्याकडे 9600 कोटींची संपत्ती आहे. चौथ्या स्थानी 7400 कोटी रुपयांच्या संपत्तीसहीत बाबुभाई लखानी चौथ्या स्थानी आहेत. ते किरेन जेम्सचे मालक आहेत. यादीत पहिल्या स्थानी असलेल्या अश्विन देसाईंनी एथर इंडस्ट्रीजची 2013 साली स्थापना केली. त्यानंतर त्यांनी रसायन उद्योगामध्ये अॅग्रो केमिकल्स, औषधं आणि तेल तसेच गॅस उद्योगामध्ये सक्रीय सहभाग नोंदवली. एथरचे गुजरातमध्ये दोन कारखाने आहेत. 2022 साली जून महिन्यामध्ये देसाई यांनी एथर इंडस्ट्रीज पब्लिक डोमेनमध्ये आणली. त्यांनी या माध्यमातून 103 मिलियन अमेरिकी डॉलर्सचा निधी उभा केला.
अश्विन देसाई यांची मुलं रोहन आणि अमन हे दोघे उद्योगामधील तांत्रिक आणि ऑप्रेशन्स विभागाचं नेतृत्व करतात. देसाई यांची पत्नी पोर्णिमा या कंपनीच्या बोर्डमध्ये सदस्य आहेत. देसाई यांनी उद्योग क्षेत्रामध्ये 1976 साली पदार्पण केलं. त्यांनी त्यांच्या मेहुण्याबरोबर रसायन उद्योग सुरु केला. 'फोर्ब्स'ने दिलेल्या माहितीनुसार, देसाई त्यांच्या आईबरोबर सुरतमध्ये स्थायिक झाले. या ठिकाणी आपण नवीन काहीतरी उद्योग सुरु करावा अशी देसाईंची इच्छा होती. "आम्ही अगदी शुन्यातून सुरुवात केली. माझ्या मेहुण्यालाही या रसायन निर्मिती क्षेत्रासंदर्भात कोणतही ज्ञान नव्हतं," असं देसाई सांगतात.
वन बीएचके घरात राहताना देसाई यांनी शहराच्या थोड्या बाहेरील बाजूस असलेली एका कंपनीची जागा भाडेतत्वावर घेतली. त्यांनी सुरुवातीला सल्फ्युरी क्लोराईड तयार करायला सुरुवात केली. हे फार घातक रसायन असून त्यावेळी भारतात याची आयात केली जायची. या रसायनाचा वापर औषध आणि रंगांच्या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यानंतर देसाई यांना उत्तरोत्तर यश मिळत गेलं आणि आज त्यांच्या मालकीचे अनेक कारखाने असून ते 100462260000 कोटी रुपयांचे मालक आहेत.
देसाई यांना पोहण्याची आवड आहे. तसेच निसर्गात भटकंती करणे आणि कविता करण्याचा देसाई यांना छंद आहे. एथर इंडस्ट्री सध्या विस्तरिकरण करत असून त्यांनी सुरतमध्ये अन्य एका कारखान्यासाठी जागा खरेदी केला आहे.