अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप करुन व्हिडिओ केला व्हायरल

नराधमांनी एवढ्यावरच न थांबता व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 7, 2017, 05:02 PM IST
अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप करुन व्हिडिओ केला व्हायरल title=

बांका : बिहारमधील बांका जिल्ह्यातील सूईया पोलिस ठाणे क्षेत्रात एका अल्पवयीन मुलीवर त्याच गावातील तीन युवकांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या नराधमांनी एवढ्यावरच न थांबता व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटूवा गावातील पीडित मुलगी ४ ऑक्टोबरला  गावाजवळील जंगलात बकरीला चरण्यासाठी घेऊन गेली होती. त्याचवेळी गावातील तीन तरुणांनी जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार करुन त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.या घटनेनंतर ग्रामपंचायतीत प्रकरणाचे निराकरण करण्याचा प्रयत्न झाला. पण तिथे हे प्रकरण न मिटल्याने मुलीने पोलीस स्थानकात धाव घेतली.
बलात्कार प्रकरणी प्राथमिक तक्रार नोंदवून घेण्यात आली असून यामध्ये गावातील पवन यादव, आणि रोहित यादव यांना आरोपी बनविण्यात आल्याचे महिला पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर मणी कुमारी यांनी सांगितले. पिडीत मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दोन आरोपी पवन यादव आणि रोहित यादव यांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.