कोरोनावर मात करण्याचा उपाय सांगा १ लाख रुपयांचं बक्षीस जिंका

कोरोना व्हायरसचा धोका दिवसागणिक वाढताना दिसत आहे.  

Updated: Mar 18, 2020, 02:58 PM IST
कोरोनावर मात करण्याचा उपाय सांगा १ लाख रुपयांचं बक्षीस जिंका title=

मुंबई : कोरोना व्हायरसचा धोका दिवसागणिक वाढताना दिसत आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या १४७ वर पोहोचली आहे. संपूर्ण जगभरात आतापर्यंत १ लाख ९८ हजार ७१४ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. तर ७ हजार ९८९ रुग्णांचा या धोकादायक व्हायरसमुळे बळी गेला आहे. महत्त्वाचं म्हणजे ८२ हजार ७७९ रूग्ण या आजारातून सुखरूप वाचले आहेत. या धोकादायक आजारातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक नागरिकांना एक पर्याय सुचवला आहे. 

India Fights Corona

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी नागरिकांना जे उपाय सुचत आहेत त्यांनी त्यांचे विचार एका माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवायचे आहेत. त्यानंतर ज्या नागरिकाचा उपाय मोदींना योग्य वाटेल त्या नागरिकास बक्षिस देखील देण्यात येणार आहे. 

मोदी सरकाने सोशल मीडियावर #IndiaFightsCorona या हॉशटॅगच्या माध्यमातून covid-19 समाधान चॅलेंजची (COVID 19 Solution Challenge) सुरूवात केली. तर पंतप्रधानांच्या या योजनेला नागरिकही पाठिंबा देत आहेत. नागरिक @mygovindia वर नागरिक आपल्या कल्पना आणि विचार व्यक्त करत आहेत. 

या स्पर्धेच्या माध्यमातून नगरिकांमध्ये तब्बल १.७५ लाखांच्या बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे. पहिल्या येणाऱ्या नागरिकास १ लाखांचं बक्षिस देण्यात येणार आहे. दुसऱ्या स्थानी येणाऱ्या स्पर्धकाला ५०,००० रूपये तर तिसऱ्या स्पर्धकाला २५,००० रूपयांचं बक्षिस देण्यात येणार आहे. @mygovindia वर ३१ मार्च पर्यंत तुम्ही तुमचे विचार मांडू शकता.