'मिशन शक्ती'वर डीआरडीओ प्रमुख सतीश रेड्डी यांची प्रतिक्रिया

 डीआरडीओचे प्रमुख सतीश रेड्डी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Updated: Mar 28, 2019, 04:02 PM IST
'मिशन शक्ती'वर डीआरडीओ प्रमुख सतीश रेड्डी यांची प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली : भारतीय वैज्ञानिकांनी अंतराळात ३०० किलोमीटर दूर लाईव्ह सेटेलाईटला (एलईओ उपग्रह) ऍन्टी सॅटेलाईटद्वारे (ए-सॅट) पाडले. या यशस्वी परिक्षणानंतर डीआरडीओ (डिफेंस रिसर्च एंड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) चे प्रमुख सतीश रेड्डी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 'मिशन शक्ती' च्या नावे ओळखल्या गेलेल्या या मिसाइलला दोन वर्षांपूर्वी हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. पण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांनी ही चाचणी व्हावी यासाठी सकारात्मकता दर्शवल्याचे ते म्हणाले.

'मिशन शक्ती' ऑपरेशन : काय आहे 'एलईओ' आणि 'ए' सॅटेलाईट, जाणून घ्या...

याच्या विकासाचे काम काही वर्षांपुर्वीच सुरू झाले होते. पण गेल्या 6 महिन्यांपासून आम्ही या मिशन मोडवर होतो. यानंतर 100 वैज्ञानिकांची एक टीम वेळ न पाहता तासनतास काम करत राहीली आणि बुधवारी परीक्षण यशस्वी झाले. केवळ तीन मिनिटांत हे ऑपरेशन पूर्ण करण्यात आलंय. 'मिशन शक्ती' असं या कठिण ऑपरेशनचं नामकरण करण्यात आलंय. बुधवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ही माहिती दिली होती. या मोहिमेद्वारे भारतीय वैज्ञानिकांनी मोहिमेचं सर्व उद्देश प्राप्त केले. भारतीयांसाठी हा गौरवास्पद क्षण आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले होते.

भारताचं 'मिशन शक्ती'

- भारतानं एका एन्टी सॅटेलाईट हत्याराद्वारे (Anti-satellite weapon) पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (एलईओ) केवळ तीन मिनिटांत एक लाईव्ह सॅटेलाईटला पाडून एक ऐतिहासिक कामगिरी केलीय.

- या मोहिमेद्वारे, चाचणी म्हणून भारतानं आपलाच एक निकामी झालेला परंतु, पृथ्वीकक्षेत ३०० किलोमीटर उंचीवर फिरणारा उपग्रह केवळ तीन मिनिटांत पाडला. पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी या उपग्रहाला केवळ ९० मिनिट लागतात. 

- या मोहिमेला मिशन शक्ती असं नाव देण्यात आलं होतं.

- 'मिशन शक्ती'द्वारे भारत अंतराळातही 'महाशक्ती' म्हणून समोर आलाय.

- भारतीय सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

- एन्टी सॅटेलाईटद्वारे भारतानं अंतराळातही आपल्या सुरक्षेची खातरजमा केलीय. 

- भारताच्या इस्रो आणि डीआरडीओ या संस्थांनी संयुक्तरित्या 'मिशन शक्ती' यशस्वी करून दाखवलंय.

एलईओ / एलईओ सॅटेलाईट म्हणजे काय?
- एलईओ / लो अर्थ ऑर्बिट अंतराळातली अशी एक कक्षा आहे जिथं सॅटेलाईट प्रक्षेपित केले जातात.

- एलईओ सॅटेलाईट हे एक असं 'टेलिकम्युनिकेशन सॅटेलाईट सिस्टम' आहे जे पृथ्वीतळापासून ४०० ते २००० किलोमीटर उंचीवर काम करू शकतं.  

- शत्रूकडून हेरगिरी करणाऱ्या किंवा नागरी कामांकरिता वापर करण्यासाठी जमिनीची अत्यंत सुस्पष्ट छायाचित्र काढणाऱ्या उपग्रहांचा वापर केला जातो, अशा उपग्रहांना रोखण्यासाठी 'उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र क्षमता' ही उपयोगी ठरणार आहे.

- हेरगिरी करणारे हे सॅटेलाईट लो अर्थ ऑर्बिटमध्येच ठेवले जातात. अशा सॅटेलाईटना केवळ तीन मिनिटांत हाणून पाडण्याची क्षमता आता भारताकडे आहे.