मला एकदा तुम्हाला 'अप्पा' म्हणायचंय, स्टॅलिन भावूक

'तो व्यक्ती ज्यान आरामाशिवाय काम केलं... तोच इथे आराम करतोय'

Updated: Aug 8, 2018, 02:22 PM IST
मला एकदा तुम्हाला 'अप्पा' म्हणायचंय, स्टॅलिन भावूक  title=

चेन्नई : डीएमके नेते एम करुणानिधी यांच्य निधनानंतर पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी आपल्या पित्याला एका भावूक पत्र लिहिलंय. करुणानिधी यांचा छोटा मुलगा आणि राजनैतिक वारसा सांभाळणारे स्टॅलिन यांनी आपल्या पत्रात आपल्या भावना व्यक्त केल्या. मी तुम्हाला 'अप्पा' (वडील) ऐवजी अनेकदा थलैवा (Thalaivare) म्हणजेच नेता म्हटलंय... पण आता मला तुम्हाला एकदा 'अप्पा' म्हणायचंय... अशी साद स्टॅलिन यांनी घातलीय. 

अधिक वाचा - एम करुणानिधी यांना मुखाग्नी नाही तर दफन केलं जाईल, का ते जाणून घ्या...

अधिक वाचा - VIDEO : एमजीआर यांच्या अंत्यदर्शनावेळी झाला होता जयललितांचा अपमान

अधिक वाचा - जयललिता यांना अग्नी दिला जाणार नाही, दफन करणार

अधिक वाचा - शशिकलांनी जयललितांच्या समाधीवर मारला तीन वेळा हात

यासोबत स्टॅलिन यांनी आपल्या पत्रात म्हटलंय... तुम्ही जगभरात कुठेही गेलात तर परतल्यानंतर तिथल्या गोष्टींविषयी चर्चा करत होता... पण यावेळी मला न सांगता तुम्ही कुठे निघून गेलात? आम्हाला सोडून तुम्ही कुठे निघून गेलात? तो व्यक्ती ज्यान आरामाशिवाय काम केलं... तोच इथे आराम करतोय, असं आपल्या समाधीवर लिहिलेलं असावं, अशी इच्छा तुम्ही ३० वर्षांपूर्वी व्यक्त केली होती. तुम्ही तमिळ समुदायासाठी खूप मेहनत घेतल्याच्या संतोषासोबत हे जग सोडलंय... की अशा एखाद्या ठिकाणी लपलात जिथे तुमच्या ८० वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील मिळकतींना कुणीही मागे टाकू शकत नाही.  

अधिक वाचा : ...म्हणून करुणानिधींनी प्रेयसीला लग्नासाठी दिला होता नकार!

अधिक वाचा : ... म्हणून करूणानिधी नेहमी काळा चष्मा घालायचे !

अधिक वाचा : जगाचा निरोप घेताना किती संपत्ती मागे सोडून गेलेत करुणानिधी, जाणून घ्या...