मोबाईल चोराला ट्रेनच्या खिडकीतच पकडलं, 10 किमी पर्यंत नेलं अशाच स्थितीत Video Viral

सोशल मीडियावर मोबाईल चोराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बिहारमधील बेगूसराय इथला असल्याचं बोललं जात आहे.

Updated: Sep 15, 2022, 07:27 PM IST
मोबाईल चोराला ट्रेनच्या खिडकीतच पकडलं, 10 किमी पर्यंत नेलं अशाच स्थितीत Video Viral title=

Mobile Phone Snatcher Caught Viral Video: स्मार्टफोन ही सर्वांची गरज बनली आहे. मात्र यावर चोरट्यांची करडी नजर असते. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मोबाईलची काळजी घ्यावी लागते. रेल्वे प्लॅटफॉर्म आणि गर्दीच्या वेळी मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. असं असताना सोशल मीडियावर मोबाईल चोराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बिहारमधील बेगूसराय इथला असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती चालत्या ट्रेनच्या खिडकीबाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसत आहे. तो आतमध्ये बसलेल्या व्यक्तींना हात न सोडण्याची विनंती करत आहे. सदर व्यक्ती मला सोडू नका, नाही तर मरेल असं स्थानिक भाषेत सांगताना दिसत आहे.

स्टेशनवरून ट्रेन सुरु झाल्यानंतर चोराने मोबाईल हात मारण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एका प्रवाशाने त्याचा हात खिडकीतच पकडला. ट्रेनने वेग पकडत प्लॅटफॉर्म सोडला होता. त्यामुळे जीवाच्या भीतीने तो लोकांना हात न सोडण्याची विनंती करत होता. लोकांनी त्याला खिडकीबाहेर पकडून पुढच्या स्टेशनवर नेले. चोरट्याचा हा प्रवास सुमारे 10 किलोमीटर चालला. शेवटी गाडी खगरियाजवळ आल्यावर लोकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

18 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत.