मोदी सत्तेत आले आणि NDA भंगारात काढली - संजय राऊत

देशाच्या राजकारणातून NDA ही संकल्पना मोडीत निघाली आहे. ज्यावेळी शिवसेना NDA मधून बाहेर पडली तेव्हाच ती मोडून पडली. 

Updated: Mar 31, 2022, 10:21 AM IST
मोदी सत्तेत आले आणि NDA भंगारात काढली - संजय राऊत title=

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणातून NDA ही संकल्पना मोडीत निघाली आहे. ज्यावेळी शिवसेना NDA मधून बाहेर पडली तेव्हाच ती मोडून पडली. याच NDA च्या बळावर मोदी ( Modi ) जेव्हा सत्तेत आले त्यानंतर त्यांनी NDA भंगारात काढली अशी टीका शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केली.

NDA मध्ये अनेक पक्ष होते. पण, ते एकेक करून बाहेर पडले. अकाली दलाचे ( Akali Dal ) नेते मला भेटले. NDA मधून जे जे पक्ष बाहेर पडले त्यांनी पुन्हा एकत्र यावे अशी भूमिका त्यांनी मांडली. शिवसेना पक्ष म्हणून मी सर्वाशी बोलत आहे. त्यांच्याशी झालेली चर्चा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackrey ) यांना भेटून सांगणार आहे, असे ते म्हणाले.

देशातील भाजपविरोधी सगळे पक्ष एकत्र यायला तयार आहेत. त्यामुळे UPA च्या जिर्णोद्वाराची तयारी करावी लागेल. पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेस लीड घायला तयार नाही. पण, कुणीतरी लीड घ्यायला हवा. ममता बॅनर्जी ( Mamta Banarji ), अरविंद केजरीवाल ( Arvind Kejrival ), उद्धव ठाकरे ( Uddhav Thackrey ) हे त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ( Sharad Pawar ) हे राजकारण भीष्म पितामह आहेत. UPA चे नेतृत्व त्यांनी करावे अशी मागणी होत असेल तर त्यात चुकीचे काय आहे. यूपीए ही कुणाची खाजगी जहागीर नाही तशी एनडीएसुद्धा नाही. भाजपविरोधात 2024 ची तयारी करायची असेल तर UPA च्या सातबाऱ्यावर अनेक नाव टाकावी लागतील. UPA त नवीन सदस्य आणावे लागतील. काँग्रेस ( Congress ) युपीएसाठी पुढे येण्यात कमी पडतेय असेही ते म्हणाले.