मोदी सरकार कोरोना लससाठी करणार 50 हजार कोटींची तरतूद

प्रत्येक भारतीयाला मिळेल कोरोनाची लस

Updated: Oct 23, 2020, 02:05 PM IST
मोदी सरकार कोरोना लससाठी करणार 50 हजार कोटींची तरतूद title=

नवी दिल्ली : कोविड -19 ची लस 130 कोटी देशवासीयांना देण्यासाठी केंद्र सरकारने 50 हजार कोटींची तरतूद केली आहे. एखाद्या व्यक्तीला लस देण्यासाठी सुमारे 385 रुपये लागतील असा सरकारचा अंदाज आहे.

ब्लूमबर्गच्या एका अहवालात हा दावा केला गेला आहे. ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने असे सांगितले आहे की, ही रक्कम या आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 मार्चपर्यंत निश्चित केली गेली आहे.

प्रत्येक व्यक्तीवर किती खर्च ?

सरकारचा असा अंदाज आहे की प्रत्येक व्यक्तीला कोविड 19 ची लस द्यावी लागेल. एका इंजेक्शनची किंमत जवळपास दीडशे रुपये असेल. या व्यतिरिक्त कोविड -19 ची दोन इंजेक्शन्स देण्यास सुमारे 385 रुपये लागतील.

सरकारच्या एका कमिटीचा असा विश्वास आहे की, भारतातील कोरोनाचा पीक टाइम निघून गेला आहे आणि फेब्रुवारी 2021 पर्यंत ते नियंत्रणात येईल. महत्त्वाचे म्हणजे कोरोनामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचे बरेच नुकसान झाले आहे. जूनच्या तिमाहीत देशाच्या जीडीपीमध्ये सुमारे 24 टक्क्यांची घट झाली.

जगातील बर्‍याच देशांमध्ये कोविड -19 च्या अनेक चाचण्या सुरू आहेत. कोविड-19 लस चाचणी सीरम इन्स्टिट्यूट आणि डॉ. रेड्डीज प्रयोगशाळांमार्फतही घेतली जात आहे आणि पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच आश्वासन दिले की कोविड -19 लस तयार होताच सरकार प्रत्येक भारतीयापर्यंत ती निश्चित करेल. 20 ऑक्टोबर रोजी त्यांनी राष्ट्राला पाठवलेल्या संदेशात, सणासुदीच्या काळात त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि कोरोनाबद्दल शिथिल होऊ नये, असा इशारा दिला.

77 लाखाहून अधिक रुग्ण

आतापर्यंत देशात एकूण कोरोनाची प्रकरणे 77 लाखांपेक्षा जास्त आहेत. साथीच्या आजाराने बाधित झालेल्या बरीच मोठी राज्यांमध्ये आता लक्षणीय घट होत आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तेथे सप्टेंबर अखेर दररोज 20 हजार पेक्षा जास्त रुग्ण वाढळत होते.