नवी दिल्ली : सौदी अरेबियाचे राजपूत्र बिन सलमान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख मोठा भाऊ असा केला. बिन सलमान सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती भवनातल्या स्वागत समारंभानंतर बिन सलमान बोलत बोलत होते. आम्ही दोघं भाऊ आहोत मोदी माझे मोठे भाऊ असल्याचं बिन सलमान यांनी म्हटलं आहे. बिन सलमान यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. सौदी अरेबिया हा पाकिस्तानचा सहानुभूतीदार देश म्हणून ओळखला जातो. असं असतानाही राजपूत्र बिन सलमान यांनी मोदींबाबत केलेल्या वक्तव्याचे भारत-सौदी अरेबिया मैत्रीवर सकारात्मक परिणाम दिसू शकतात.
Delhi: Saudi Arabia Crown Prince Mohammed bin Salman receives a ceremonial reception at the Rashtrapati Bhawan. pic.twitter.com/dLJZXQdWSo
— ANI (@ANI) February 20, 2019
पीएम मोदींनी द्विपक्षीय चर्चेआधी राष्ट्रपती भवनमध्ये त्यांचं स्वागत केलं. त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं. बिन सलमान यांनी म्हटलं की, 'दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध असावे आणि ते अजून चांगले व्हावे असं आम्हाला वाटतं. चांगले संबंध हे दोन्ही देशाच्या हितासाठी आहे.'
Saudi Arabia Crown Prince Mohammed bin Salman at Rashtrapati Bhawan, Delhi: Today we want to be sure that this relation is maintained&improved for the sake of both countries. With the leadership of the President&the PM, I am sure we can create good things for Saudi Arabia & India pic.twitter.com/mXSTSBjxQS
— ANI (@ANI) February 20, 2019
सऊदी अरेबियाचे राजपूत्र मोहम्मद बिन सलमान मंगळवारी रात्री दिल्लीला पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोटोकॉल तोडत विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर सऊदीचे राजपूत्र भारत दौऱ्यावर आले आहेत. भारत त्यांच्यापुढे पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा चर्चेत आणू शकते. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये संबंध वाढावा म्हणून देखील काही करार होऊ शकतात.