नवी दिल्ली : नॉर्थ ईस्टच्या तीन राज्यांच्या दौऱ्यानंतर आता पंतप्रधान मोदी दक्षिणेच्या दौऱ्यावर आहेत. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये पंतप्रधान निवडणूक रॅली करणार आहेत. गुंटूरमध्ये त्यांच्या रॅलीला सुरूवात देखील झाली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पंतप्रधान रॅलीला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. आंध्र प्रदेशमधील गुंटूर, तामिळनाडूती तिरुपुर आणि कर्नाटकमधील हुबळी मध्ये के रॅली करणार आहेत.
तेलुगू देशम पार्टी ( टीडीपी) प्रमुख आणि मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी पंतप्रधानांच्या यात्रेस काळा दिवस म्हटले आहे. पंतप्रधानांच्या आंध्र प्रदेश दौऱ्याआधी मोठमोठे पोस्टर्स लागले आहेत. यामध्ये पंतप्रधानांना विरोध केला जात आहे. 'मोदी नेवर अगेन' असे या पोस्टर्समध्ये म्हटले आहे.
Anti-Modi posters emerge ahead of PM's rally in Andhra on Sunday
Read @ANI Story | https://t.co/dJNN5Qp49o pic.twitter.com/CkULAAtw6V
— ANI Digital (@ani_digital) February 10, 2019
पंतप्रधान मोदी नॉर्थ ईस्ट प्रमाणे साऊथमध्ये देखील काही योजनांचे लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान आंध्र प्रदेशमध्ये पेट्रोलियम आणि गॅसशी संबंधित 6,825 कोटी रुपयांच्या योजनेचे लोकार्पण करणार आहेत. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एका टर्मिनलचे भूमीपुजन करण्यात येणार आहे. तेलगू देशम पार्टीने भाजपा सोबत युती तोडली आहे. यानंतर पंतप्रधानांची ही पहीली रॅली आहे.
पंतप्रधान विरोधात रस्त्यावर होणाऱ्या आंदोलनाकडे देशाचे लक्ष जाईल यासाठी चंद्रबाबू यांनी जोरदार तयारी केली आहे. त्यांनी टेलीकॉन्फरन्स कॉल करुन कार्यकर्ता आणि पार्टी सदस्यांना आवाहन केले. केंद्राने राज्यासोबत विश्वासघात केल्याविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन व्हायला हवे आणि संपूर्ण देशाचे लक्ष याकडे यावे असेही त्यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना सांगितले.
टीडीपी प्रमुख सोमवारी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान विरोधी आंदोलन सुरू ठेवणार आहेत. महात्मा गांधी यांनी दाखवलेला मार्ग अवलंबूनच आम्ही विरोध करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 2014 मध्ये राज्याच्या विभाजनानंतर झालेली बरबादी पाहण्यासाठी मोदी येत असल्याचा आरोप नायडू यांनी केला. लोक अजून जिवंत आहेत का ? हे बघण्यासाठी ते येत आहेत का ? असा तिखट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही चंद्रबाबू यांनी केला आहे.