फेसबुक प्रेमीसाठी आईने घेतला पोटच्या गोळ्याचा जीव; 'लव्ह स्टोरी'चं धक्कादायक सत्य आलं समोर

काय नक्की आहे हे प्रेम प्रकरण? 

Updated: Jul 6, 2021, 07:15 AM IST
फेसबुक प्रेमीसाठी आईने घेतला पोटच्या गोळ्याचा जीव; 'लव्ह स्टोरी'चं धक्कादायक सत्य आलं समोर

मुंबई : प्रेम, प्रेम विरह असे अनेक प्रेमासंबंधित किस्से आपण पाहातो आणि ऐकतो. काही प्रेम प्रकरणं अशी असतात ज्यावर आपण विश्वास ठेऊचं शकत नाही. पण हे प्रेम प्रकरण वाचल्यानंतर तुम्हाला मोठा धक्का बसेल. नुकताच केरळमधील एक प्रेम प्रकरण चर्चेत आलं आहे. या प्रेम प्रकरणात ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी महिलेने तिच्या पोटच्या गोळ्याला सोडलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेला एका व्यक्तीसोबत प्रेम झालं होतं. हे प्रकरण केरळमधील कोलम जिल्ह्यातील आहे. 

कल्‍लूवथुक्‍कल गावात राहणारी ही महिला तिच्या बाळाला सोडून तिच्या फेसबूक प्रेमीसोबत पळून गेली. या  प्रकरणातील धक्कादायक गोष्ट म्हणजे घटनेमुळे दोन नातेवाईकांसोबत नवजात बाळाचा देखील मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या तपासात एक थक्क करणारी बाब समोर आली. महिलेच्या तथाकथित फेसबुक प्रेमीचे अकाऊंट तिचेचं दोन नातेवाईक चालवत होते.

महिलेचे नातेवाईक तिच्याशी प्रेमी म्हणून बोलत असत. जेव्हा या दोघींना कळालं या दोघींचं प्रैंक चुकीच्या मार्गाने जात आहे, तेव्हा पोलिसांच्या भिती दोघींनी आत्महत्या केली. तर दुसरीकडे रबरच्या शेतात सापडलेल्या नवजात मुलाचा रुग्णालयात मृत्यू झाला. अशा परिस्थितीत मुलाची आई शोधण्यासाठी पोलिसांनी परिसरातील अनेक महिलांचे डीएनए नमुने घेतले होते.

त्यानंतर अखेर 22 जून रोज महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तपासादरम्यान पोलिसांना समजले की महिला तिची चुलत बहिण आर्यकडून घेतलेलं सिम कार्ड चालवत होती. तेच सिम फेसबुक मित्रांशी संवाद साधण्यासाठी वापरल्याचा पोलिसांना संशय आहे. जेव्हा महिलेला चौकशीसाठी बोलविण्यात आले तेव्हा ती मैत्रिणीसोबत  बेपत्ता झाली. त्यांचे मृतदेह जवळील नदीत सापडले.