जेव्हा माकड बिअर मारतं 'टॉप टू बॉटम', बेवड्या माकडाचा Video तुफान व्हायरल!

Viral Video of monkey drinking Beer : उत्तर प्रदेशातील रायबरेलीतील एका बेवड्या माकडाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या माकडाने दारूच्या व्यसनामुळे...

Updated: Nov 1, 2022, 09:14 PM IST
जेव्हा माकड बिअर मारतं 'टॉप टू बॉटम', बेवड्या माकडाचा Video तुफान व्हायरल! title=
Viral Video of monkey drinking beer

Monkey Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही थरारक तर काही इंटरेस्टिंग व्हिडिओ पहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एक माकड दारूच्या नशेत दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे उघडेच्या उघडे राहिल्याचं दिसतंय.

माकडांना अनेकदा माकडचाळे करताना पहायला मिळतं. तसेच अनेकदा माकड माणसांची नक्कल देखील करतं. माकडं साधारणरित्या कळपांमध्ये दिसतात. नेहमी फिरतीवर असलेली माकडं कधी मनुष्यवस्ती धुडघूस घातलाना दिसतात. राग आल्यावर माकडं कोणावरही हल्ला करतात. अशातच आता एका बेवड्या माकडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

उत्तर प्रदेशातील रायबरेलीतील एका बेवड्या माकडाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या माकडाने दारूच्या व्यसनामुळे उच्छाद मांडलाय, त्यामुळे आता गावकरी देखील टेन्शनमध्ये आले आहेत. कारण ठरलं... माकडाला लागलेलं व्यसन

पाहा व्हिडीओ - 

दरम्यान, रायबरेलीतील उच्छाद मांडलेल्या माकडाला बियरचं व्यस्न लागलंय. तोच बँड पाहिजे, असं जणू माकडाने ठरवलंय. माकड दुकानातून बाटल्या उचलून पळवून नेत होता. आता लोकांच्या हातातून बाटल्या पळवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे लोकांनी आता डोक्याला हात लावलाय.