आताच Download करा हे ऍप, डासांच्या त्रासापासून होईल सुटका

Mosquito Killer Apps | अनेकदा डासांच्या त्रासांना आपल्याला सामोरं जावं लागतं. वातावरणात बदल झाल्यानंतर डासांची उत्पत्ती वाढते. त्याचा आपल्याला त्रास होतो.

Updated: Aug 9, 2022, 08:49 AM IST
आताच Download करा हे ऍप, डासांच्या त्रासापासून होईल सुटका title=

Mosquito Killer Apps | अनेकदा डासांच्या त्रासांना आपल्याला सामोरं जावं लागतं. वातावरणात बदल झाल्यानंतर डासांची उत्पत्ती वाढते. त्याचा आपल्याला त्रास होतो. अनेकदा डासांच्या उपद्रव आरोग्याला हानीकारक ठरतो. त्यामुळे आपण धूर आणि कॉईल वेगैरे लावून डासांना घालवण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्हाला कॉईल किंवा धूर करण्याची गरज नाही. तुमच्या स्मार्टफोनमध्ये एक ऍप इन्स्टॉल करून तुम्ही डासांच्या त्रासापासून सूटका करू शकता. 

Mosquito Killer Apps:पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डास आणि माशांच्या त्रास जाणवतो. डासांमुळे डेंगू - मलेरिया सारखे आजार होतात. त्यापासून बचावासाठी आपण घरात डास घालवणारे कॉईल वापरतो. अनेकजण घरात धूर करून डासांना घालवण्याचा प्रयत्न करतात. 

परंतू आता तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. आता असे गॅजेट्स बाजारात आहेत की, विना धूराचेही डास घराबाहेर पळतील. आता स्मार्टफोनमध्येच असे ऍप्स आले आहेत, ज्यामुळे डासांचा खात्मा होऊ शकतो. 

Google Play Store वर अनेक ऍप उपलब्ध

गुगल प्ले स्टोअरवर अनेक असे ऍप आहेत.ज्यामुळे डास पळवण्यास मदत होते. यामध्ये Mosquito Killer, Mosquito Sound, Frequency Generator या ऍपचा सामावेश आहे. 

हे ऍप्स फ्रीक्वेन्सी साऊंड उत्पन्न करतात. या आवाजमुळे डास पळ काढतात. या ऍपमधील डासांना पळवण्यासाठीचा आवाज इतका कमी असतो की, तो एखाद्या व्यक्तीला ऐकू येऊ शकत नाही. ऍप निर्मात्यांचा दावा आहे की, तो आवाज डासांपर्यंत पोहचून त्यांना घालवण्यास फायदेशीर ठरतो.

हे ऍप परिणामकारक आहेत का?

या ऍप्सला सध्यातरी खूपच कमी रेटींग दिसत आहे. ज्या लोकांनी हे ऍप्स इंस्टॉल केले आहेत. त्यांनी ऍप्सला कमी रेटींग दिले आहेत. त्यांच्या मते ऍप्स परिणामकारक नाही. ऍप सुरू करून देखील डासांचा त्रास कमी होत नाही. 

परंतू तुम्ही देखील असे काही ऍप्स इंस्टॉल करून प्रयत्न करू शकता. एखादे ऍप खरंच परिणामकारकही ठरू शकते.