नवी दिल्ली : एकाच घरात एक -दोन नाही तर तब्बल 100 हून अधिक नाग सापडले आहेत. या घटनेनंतर या भागात एकच खळबळ उडाली आहे. या घरात एक मोठी नागिन आणि तिचे छोटे पिल्लं सापडली आहेत.
ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यात एका गावात या घटनेनंतर सगळेच हैराण झाले आहेत. घरात 100 हून अधिक नाग पाहिल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या. या घरात देवघरात एक वारुळ होतं ज्यामध्ये त्यांना एक मोठी नागिन दिसली. जेव्हा वारुळ पूर्णपणे काढण्यात आलं तेव्हा त्यामध्ये नागिनीची 100 हून अधिक पिल्लं आढळली. त्यानंतर सर्पमित्रांना बोलवून त्यांना तेथून काढलं गेलं.
More than 100 baby cobras and two adult cobras rescued by forest officials from a house in a village in Odisha's Bhadrak district. 21 eggs also recovered. (24.6.18) pic.twitter.com/pgRn5OqPjj
— ANI (@ANI) June 25, 2018
अनेक दिवसांपासून हे नाग या घरात होते. पण त्यांचा त्रास घरातल्य़ा कोणत्याही व्यक्तीला झाला नाही. पण अचानक एक दिवस हे साप इतक्या मोठ्य़ा प्रमाणात आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.