मुंबई : कोरोना महामारीच्या काळात आरोग्य विमा असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. आजच्या या परिस्थितीचा विचार करता ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा पॉलिसी आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत महत्त्वाची ठरते. अशी आरोग्य विमा पॉलिसी केवळ कॅशलेस उपचाराची सुविधाच देत नाही तर आर्थिक स्थितीवर होणाऱ्या परिणामापासून संरक्षणही करते.
पण ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्थ पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. तुमच्या पालकांसाठी आरोग्य विमा पॉलिसी घेण्यापूर्वी तुम्ही पुढील बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असते.
नेटवर्क हॉस्पिटल
ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत, आपत्कालीन परिस्थितीत प्रवास करणे अत्यंत कठीण होऊन बसते. त्यामुळे पॉलिसी घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की हॉस्पिटलचे नेटवर्क किती मोठे आहे? जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत दुरवरच्या रुग्णालयात भटकावे लागणार नाही, नेटवर्क असे असले पाहिजे की रुग्णाला काही मिनिटांत हॉस्पिटलची कॅशलेस सेवा मिळेल.
प्रतीक्षा कालावधी
आरोग्य विमा पॉलिसी घेताना आधीपासून असलेल्या असलेल्या आजारांसाठी प्रतीक्षा कालावधी असतो. याचा अर्थ असा की ठराविक कालावधीनंतरच, तुम्ही काही सूचीबद्ध रोगांसाठी उपचारांच्या कव्हरेजचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे, पॉलिसी निवडताना, प्रतीक्षा कालावधी कमी असावा हे लक्षात ठेवा.
मोफत वैद्यकीय तपासणी
वृद्धापकाळात गंभीर आजार टाळण्यासाठी, त्याचे प्रतिबंध आणि संरक्षण देखील आवश्यक आहे. त्यामुळे पॉलिसी निवडताना लक्षात ठेवा की त्यात वेळोवेळी मोफत वैद्यकीय तपासणीची सुविधा असावी जेणेकरून कोणताही गंभीर आजार अचानक दिसण्यापूर्वीच कळू शकेल.
को पेमेंट सुविधा
सोप्या भाषेत सांगायचे तर, को-पेमेंट ही एक पूर्वनिर्धारित रक्कम आहे. जी विमाधारकाने क्लेमच्यावेळी भरल्याचा दावा केला आहे. जे लोक कमी प्रीमियम भरून को-पेमेंट सुविधा घेतात, त्यांना क्लेमच्या वेळी विमा कंपनीकडे कमी रक्कम भरावी लागते.