Rahul Gandhi, KGF: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या विविध कारणामुळे चर्चेत आहे. कन्याकुमारी ते श्रीनगर अशी ही यात्रा, संपुर्ण भारतात नवं वादळ निर्माण करताना दिसत आहे. अशातच आता भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू असतानाच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. त्याला कारण काय तर KGF...
सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा तेलंगाणात (Telangana) आहे. यात्रा सुरू असताना एमआरटी म्युझिक कंपनीने राहुल गांधी, सुप्रिया श्रीनेत आणि जयराम रमेश यांच्यावर खटला दाखल केला आहे. कॉपीराईटचं उल्लंघन (Copyright infringement) केल्याप्रकरणी हा खटला दाखल करण्यात आलाय. नेमकं प्रकरण काय ते पाहूया...
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमने कंबर कसली आहे. अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media Video) तुफान व्हायरल होत आहेत. राहुल गांधी यांचा व्हिडीओ अनेकांच्या स्टेटसला देखील झळकतोय. अशातच आता प्रसिद्ध चित्रपट केजीएफमधील (KGF-2) गाण्याचा वापर केल्याने एमआरटी म्युझिक कंपनीने राहुल गांधी आणि आणखी दोन नेत्यांच्याविरोधात खटला दाखल केलाय.
आणखी वाचा- सुषमा अंधारे म्हणतात 'मी पोलिसांच्या नजरकैदेत', वाचा कुठे आहेत सुषमा अंधारे?
दरम्यान, एमआरटी म्युझिक कंपनीकडे (MRT Music Comp) तब्बल 20 हजारहून अधिक गाण्यांचे म्युझिक राईट्स आहेत. त्यामुळे आता कॉपीराईटचा वापर करत कंपनीने खटला दाखल केला. आम्हाला न विचारता काँग्रेसने आमच्या गाण्यांचा वापर केलाय, असा आरोप एमआरटी म्युझिक कंपनीने केला आहे. त्यामुळे आता नवं वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.