मुकेश अंबानी यांचा नातूही म्हणतो, 'स्कूल चले हम'; पाहा कोणत्या शाळेत मिळालंय Admission

पहिल्या दिवशीचा फोटो होतोय Viral   

Updated: Mar 16, 2022, 04:59 PM IST
मुकेश अंबानी यांचा नातूही म्हणतो, 'स्कूल चले हम'; पाहा कोणत्या शाळेत मिळालंय Admission  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर माध्यमांच्या नजरा खिळलेल्या असतात. अशा या कुटुंबातील सर्वात धाकटा सदस्य म्हणजे अंबानी यांचा नातू पृथ्वी. आकाश आणि श्लोका अंबानी यांचा हा मुलगा. 

काही दिवसांपूर्वीच वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळं पृथ्वीच्या नावाच्या चर्चा होत्या. ज्यानंतर आता हाच पृथ्वी म्हणे शाळेत जाऊ लागलाय. 

काय म्हणता... इतका मोठा झाला हा चिमुकला? असाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना? तर, याचं उत्तर आहे हो.... 

पृथ्वी शाळेला जाऊ लागला आहे आणि त्याचे आई- बाबा त्याला शाळेत सोडण्यासाठी , शाळेतून आणण्यासाठीही गेले होते. 

अंबानी कुटुंबाचा नातू परदेशातच शिक्षण घेईल असा अंदाज ज्यांनी बांधला होता, त्यांना हे जाणून धक्का बसेल की पृथ्वी हा भारतातच मुंबईतील मलबार हिल येथे असणाऱ्या सनफ्लॉवर स्कूल या शाळेपासून त्याच्या शैक्षणिक आयुष्याची सुरुवात करणार आहे.  

आकाश आणि श्लोका यांचं शिक्षणही याच शाळेत झाल्याचं म्हटलं जातं. ज्यामुळं या चिमुकल्यासाठीही कुटुंबानं एकमतानं याच शाळेची निवड केली. 

कुटुंबाकडे गडगंज श्रीमंती असली तरीही सर्वसामान्यांप्रमाणेच आयुष्य जगण्याचीच शिकवण अंबानी कुटुंबीय पृथ्वीला देऊ इच्छितात. यासाठीच त्यांनी अंगणवाडीपासूनच त्याच्यावर हे संस्कार बिंबवण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. 

अनेकांसाठी 'प्रिन्स ऑफ इंडिया' असणारा हा पृथ्वी आता त्याच्या या अगदीच नवख्या शाळेमध्ये कसा रमतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.