लाव तू आग! प्रसिद्धीच्या नाद जीवावर बेतला, अन् तो मरता मरता वाचला

अर्रर्र....! रिल करताना असले उद्योग करा नका! नाहीतर या तरुणावर जी वेळ आलीय ती तुमच्यावरही येईल

Updated: Mar 16, 2022, 04:36 PM IST
लाव तू आग! प्रसिद्धीच्या नाद जीवावर बेतला, अन् तो मरता मरता वाचला title=

नवी दिल्ली : रातोरात प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक सोशल मीडियावर वेगवेगळे स्टंट आणि रिल्स तयार करतात. कधी ते मजेशीर असतात तर कधी जीवघेणे. काही लोक कुणाला तरी फॉलो करून स्टंट करायला जातात पण त्याचे परिणाम काय होणार याची कल्पना तरुणांना नसते. 

तुम्ही असा जीवघेणा स्टंट करण्याआधी 10 वेळ विचार करा. करूच नका कारण असे स्टंट जीवावर बेतू शकतात. प्रसिद्धीसाठी हा मुलगा स्वत:च्याच पाठीला आग लावायला निघाला. पण हा स्टंट त्याला चांगलाच महागात पडला आहे. 

हा मुलगा स्टंट करायला गेला पण त्याच्या पाठीवर आग लागली. हा व्हिडीओ पाहून लोक देखील हैराण झाले आहेत. या व्हिडीओमधून धडा घेण्यासारखा आहे. प्रसिद्धीसाठी जीव धोक्यात घालणं चुकीचं आहे. 

हा तरुण स्टंट करण्याच्या नादात आपल्याच पाठीला आग लावतो. त्याच्या शर्टसोबत त्याच्या बनियनलाही आग लागते. जीव वाचवण्यासाठी तो पळत सुटतो. @ViciousVideos नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 18 सेकंदाचा हा व्हिडीओ खूप मोठा संदेश देणारा आहे.