Multibagger penny stock | 97 पैशांचा स्टॉक पोहचला 194 वर; 1 लाखाचे झाले तब्बल 2 कोटी

जर तुम्हालाही शेअर बाजारात (Stock Market)मध्ये पैसे गुंतवणूक चांगली कमाई करायची असेल तर, अचुक शेअरची निवड करणे गरजेचे ठरते. 

Updated: Dec 25, 2021, 12:37 PM IST
Multibagger penny stock | 97 पैशांचा स्टॉक पोहचला 194 वर; 1 लाखाचे झाले तब्बल 2 कोटी  title=

मुंबई : जर तुम्हालाही शेअर बाजारात (Stock Market)मध्ये पैसे गुंतवणूक चांगली कमाई करायची असेल तर, अचुक शेअरची निवड करणे गरजेचे ठरते. योग्य शेअरची निवड तुम्हाला दमदार रिटर्न मिळवून देऊ शकतो. काही शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. या शेअर्सने गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. असाच एक शेअर म्हणजे Dihjam होय. हा एक टेक्सटाइल इंडस्ट्रीजशी संबधीत शेअर आहे. मागील ३ वर्षात 0.97 रुपयांनी वाढून तो 197 रुपयांवर पोहचला आहे.

1 महिन्यात 66 रुपयांवरून 194 रुपयांवर 

Dihjam शेअरच्या चार्टवर नजर टाकल्यास लक्षात येते की, मागील एका महिन्यात शेअर 66 रुपयांनी वाढून 194 रुपयांव पोहचला आहे. 1 महिन्यात शेअर साधारण 90 टक्क्यांनी वाढला आहे. मागील  3 महिन्यात हा स्टॉक 17.27 रुपयांनी वाढून 194 रुपयांवर पोहचला आहे. 

याप्रमाणे 1 वर्षात हा शेअर 3.98 रुपयांनी वाढून 194 रुपयांवर आला आहे. या अवधीत शेअरमध्ये 4800 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. 

1 लाखाचे झाले 3 कोटी

जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक महिन्यापूर्वी 1 लाख रुपयांचे शेअर खरेदी केले असते. तर आज 1.90 लाख झाले असते. त्याचप्रमाणे गुंतवणूकदाराने 3 वर्षापूर्वी शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर, आज त्याला 2 कोटी रुपयांचा परतावा मिळाला असता.

---

Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमधील मल्टीबॅगर शेअर

 टाटा ग्रुपची कंपनी (Tata Motors) टाटा मोटर्सचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. नेहमीच उतार चढ होत असलेला हा शेअर सध्या चांगल्या वॅल्युएशनवर दिसून येत आहे. शॉर्ट टर्म गुंतवणूकीसाठीदेखील आता हा स्टॉक चांगली निवड ठरू शकतो. ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्ट रिसर्चने टेक्निकल ऑब्जर्वेशनच्या आधारावर शेअरमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने 200 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहे. TATA मोटर्स बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील मोठा शेअर आहे. सप्टेंबर तिमाहीमध्ये त्यांच्याकडे टाटा मोटर्सची 1.1 टक्के इतकी होल्डिंग होती.

टाटा मोटर्स 
ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्ट रिसर्चने टेक्निकल ऑब्जर्वेशनच्या आधारावर टाटा मोटर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने शेअरसाठी 570 रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच 515-523 रुपयांच्या पातळीवर खरेदी करण्यासह 486 रुपयांचा स्टॉपलॉस देण्यात आला आहे.  

कंपनीचा बिझनेस आउटलुक
टाटा मोटर्सच्या सर्व तिन्ही बिझनेसमध्ये रिकवरी दिसून येत आहे. कमर्शिअल व्हेहिकल्समध्ये साइक्लिक आणि जेएलआरमध्ये साइक्लिक आणि स्ट्रक्चरल सुधारणा होत आहेत.. कंपनीच्या पॅसेंजर व्हेहिकल्स सेंगमेंटमध्ये जबरजस्त रिकवरी दिसून येत आहे. नवीन प्रोडक्ट लॉंच, मार्केट शेअरमध्ये वाढ झाल्याने कंपनीला येत्या काही महिन्यात दमदार सपोर्ट मिळू शकतो.

राकेश झुनझुनवालांकडे किती शेअर्स?
बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्याकडे TATA Motors ची 1.1 टक्के हिस्सेदारी आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा मोटर्सचे 36750000 शेअर आहेत.