Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमधील मल्टीबॅगर शेअर; पुन्हा तुफान पैसा खेचण्याच्या तयारीत

 टाटा ग्रुपची कंपनी टाटा मोटर्सचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. नेहमीच उतार चढ होत असलेला हा शेअर सध्या चांगल्या वॅल्युएशनवर दिसून येत आहे

Updated: Dec 25, 2021, 11:52 AM IST
Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमधील मल्टीबॅगर शेअर; पुन्हा तुफान पैसा खेचण्याच्या तयारीत title=

मुंबई : टाटा ग्रुपची कंपनी (Tata Motors) टाटा मोटर्सचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. नेहमीच उतार चढ होत असलेला हा शेअर सध्या चांगल्या वॅल्युएशनवर दिसून येत आहे. शॉर्ट टर्म गुंतवणूकीसाठीदेखील आता हा स्टॉक चांगली निवड ठरू शकतो. ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्ट रिसर्चने टेक्निकल ऑब्जर्वेशनच्या आधारावर शेअरमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने 200 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहे. TATA मोटर्स बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील मोठा शेअर आहे. सप्टेंबर तिमाहीमध्ये त्यांच्याकडे टाटा मोटर्सची 1.1 टक्के इतकी होल्डिंग होती.

टाटा मोटर्स 
ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्ट रिसर्चने टेक्निकल ऑब्जर्वेशनच्या आधारावर टाटा मोटर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने शेअरसाठी 570 रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच 515-523 रुपयांच्या पातळीवर खरेदी करण्यासह 486 रुपयांचा स्टॉपलॉस देण्यात आला आहे.  

कंपनीचा बिझनेस आउटलुक
टाटा मोटर्सच्या सर्व तिन्ही बिझनेसमध्ये रिकवरी दिसून येत आहे. कमर्शिअल व्हेहिकल्समध्ये साइक्लिक आणि जेएलआरमध्ये साइक्लिक आणि स्ट्रक्चरल सुधारणा होत आहेत.. कंपनीच्या पॅसेंजर व्हेहिकल्स सेंगमेंटमध्ये जबरजस्त रिकवरी दिसून येत आहे. नवीन प्रोडक्ट लॉंच, मार्केट शेअरमध्ये वाढ झाल्याने कंपनीला येत्या काही महिन्यात दमदार सपोर्ट मिळू शकतो.

राकेश झुनझुनवालांकडे किती शेअर्स?
बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्याकडे TATA Motors ची 1.1 टक्के हिस्सेदारी आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा मोटर्सचे 36750000 शेअर आहेत.