मुंबई : Multibagger Penny Stock : गेल्या काही वर्षांत शेअर बाजाराने मोठा परतावा दिला आहे. काही स्टॉक्स असे आहेत ज्यांच्यात कमी पैसे गुंतवूनही चांगले रिटर्न्स मिळाले आहेत. काही स्टॉक्सने गुंतवणूकदारांना रातोरात करोडपती बनवले आहे. परंतू त्यासाठी तुम्हाला अचूक स्टॉकची निवड करणे गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल सांगणार आहोत.
अनेक मल्टीबॅगर स्टॉक्सनी गुंतवणूकदारांचा श्रीमंत केलं आहे. अनेक स्टॉक्स अजूनही चांगला परतावा देत आहेत. आज आपण ज्या स्टॉकबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे Simplex Papers Ltd. आहे.
या कंपनीच्या स्टॉकने मागील एका वर्षात 10 हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या काही सत्रांपासून त्यात घट होत असली तरी सध्या शेअर 4000 टक्के रिटर्न्सच्या पातळीवर ट्रेड करीत आहे.
सिम्प्लेक्स पेपर लिमिटेडच्या स्टॉकचा गेल्या 52 आठवड्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिल्यास, डिसेंबरमध्ये तो 122.70 रुपयांच्या उच्च पातळीवर होता. त्यानंतर हा स्टॉक सध्या, घसरणीसह व्यवहार करीत आहे. पण तरीही 2021 च्या सुरुवातीला ज्यांनी गुंतवणूक केली होती ते फायद्यात आहेत.
जानेवारी 2021 मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये 50 हजारांची गुंतवणूक केली आहे. त्यांची गुंतवणूक 40 लाखांहून अधिक झाली आहे.
एक वर्षापूर्वी हा पेनी स्टॉक होता आणि जानेवारी 2021 मध्ये त्याची किंमत 1 रुपये होती. त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत त्यात फारशी वाढ दिसून आली नाही, परंतु त्यानंतर विक्रमी उच्चांकासह 122 रुपयांची पातळी गाठली. म्हणजेच सिम्प्लेक्सचा गेल्या सहा महिन्यांचा परतावा उत्कृष्ट आहे, असे म्हणता येईल.
सिम्प्लेक्स पेपरच्या शेअरने सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना 1500 टक्के परतावा दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी 13 जुलै 2021 रोजी तो 4.63 रुपयांच्या पातळीवर होता. 13 एप्रिल रोजी बंद झालेल्या सत्रात या शेअरची किंमत 41.10 रुपये आहे. स्टॉकमधून मिळणाऱ्या रिटर्न्सचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर एकदा तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
भारतातील सिम्प्लेक्स पेपर्स लिमिटेड कागदाच्या होलसेल व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनी पेपर उत्पादने देखील करते. कंपनीच्या उत्पादनांमध्ये लेखन पेपर, बाँड पेपर, कॉपियर पेपर, लेझर पेपर, न्यूज प्रिंट पेपर आणि प्रिंटिंग पेपर यांचा समावेश होतो.