Multibagger Stock: या शेअर होल्डर्सला लागला जॅकपॉट, पैशांचा पडला पाऊस, गुंतवणूकदार झाले मालामाल

आज आम्ही तुम्हाला अशा एका शेअरबाबत सांगणार आहोत ज्याने फक्त 15 दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आणि गुंतवणूकदारांना मालामाल देखील केलं आहे. 

Updated: Sep 8, 2022, 08:48 PM IST
Multibagger Stock: या शेअर होल्डर्सला लागला जॅकपॉट, पैशांचा पडला पाऊस, गुंतवणूकदार झाले मालामाल title=

Multibagger Penny Stock:  जर तुम्हीही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल किंवा तुम्हाला कमी दिवसात पैसे दुप्पट कराचे असतील, तर तुम्हाला एका अशा शेअरबाबत माहिती देणार आहोत ज्याने केवळ पंधरा दिवसात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 

खरंतर कोरोनानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली होती. यादरम्यान असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केलेत. आपल्यापैकी अनेकांनी हे अनुभवलं देखील असेल. त्यामुळे तुम्हाला कमी काळात मोठा पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला ही बातमी वाचलीच पाहिजे.

लाखाचे दोन लाख, गुंतवणूकदार मालामाल

आम्ही ज्या शेअरबाबत बोलत आहोत तत्याचं नाव आहे डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस (DCM Financial Services). या शेअरने गेल्या पंधरा दिवसात तब्बल 101 टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे या शेअरमध्ये तुम्ही लाख रुपये गुंतवले असते तर तुमचे दोन लाख नक्की झाले असते. 

आजही पाहायला मिळाली 4% तेजी 

आजही या शेअरच्या किमतीत तब्बल 4.44 % तेजी पाहायला मिळाली. आज शेअर मार्केट बंद झाल्यावर या शेअरची किंमत  7.05 रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये या शेअरच्या किमतीत  19.49% तेजी पाहायला मिळाली आहे.

गेल्या महिनाभरात किती वधारला शेअर? 

गेल्या एका महिन्यापूर्वी या शेअरची किंमत 3.60 रुपये होती. दरम्यान गेल्या महिनाभरात 95.83% वधारलेला पाहायला मिळाला. गेल्या महिनाभरात हा शेअर तब्बल 3.45 रुपयांनी वधारला आहे मागील सहा महिन्याचे चार्ट पाहिल्यास तब्बल 80% शेअर वधारलेला पाहायला मिळतोय.  

एका वर्षाचा कसा होता परफॉर्मन्स

या वर्षाचा विचार केल्यास (जानेवारी ते आतापर्यंत) केल्यास या शेअरमध्ये 85.53 % तेजी पाहायला मिळाली आहे. मात्र, गेल्या 9 सप्टेंबर 2021 ला याच शेअरची किंमत केवळ 2.30 रुपये होती. एका वर्षात या कंपनीचा शेअर 206.52% वधारला आहे. म्हणजेच सोप्या भाषेत बोलायचं झाल्यास एक लाखाचे तब्बल तीन लाख झालेले  झाल्याचं पाहायला मिळतंय. 

(विशेष नोंद - ही बातमी म्हणजे कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीची असते. कुणाला गुंतवणूक करायची झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)