या शेअरने एका वर्षात दिले 290 टक्के रिटर्न, 5 लाखांचे झाले 19 लाख रुपये

 Share: शेअर बाजारामध्ये असे बरेच समभाग आहेत, ज्यांनी गेल्या 12 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 290 टक्के परतावा दिला आहे.

Updated: Jun 22, 2021, 06:31 PM IST
या शेअरने एका वर्षात दिले 290 टक्के रिटर्न, 5 लाखांचे झाले 19 लाख रुपये  title=

मुंबई : Multibagger Share: शेअर बाजारामध्ये असे बरेच समभाग आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणुकींना अतिशय कमी कालावधीत बंपर रिटर्न दिले आहेत. डेटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेसचा (Datamatics Global Services) वाटादेखील त्यापैकी एक आहे. गेल्या 12 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 290 टक्के परतावा दिला आहे.

12 महिन्यात 290 टक्के परतावा  

आजच्या अगदी एक वर्षापूर्वी म्हणजेच 22 जून 2020 रोजी या कंपनीचा शेअर 48.20 रुपये होता. जो आज 189.90 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना संपूर्ण 290 टक्के चांगला परतावा मिळाला आहे. या काळात सेन्सेक्स परतावा 51 टक्के झाला आहे. जर आपण 22 जून 2020 रोजी या शेअरमध्ये 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याची किंमत 19.7 लाख रुपये झाली आहे.

डेटामॅटिक्स (Datamatics) ही ग्लोबल टेक्नॉलॉजी, बीपीएम आणि डिजिटल सोल्युशन्स कंपनी आहे. जी डेटा-आधारित व्यवसायांची उत्पादकता आणि अनुभव सॉल्यून्शस करण्यासाठी उपाय सुचवते.

Datamatics Globalने 6 महिन्यांत 90 टक्के दिला रिटर्न

गेल्या 6 महिन्यांत या शेअरमध्ये 90 टक्क्यांनी वाढ झाली असून या वर्षाच्या सुरूवातीपासूनच 57.4 टक्के पर्यंत परतावा दिला आहे. बिझनेस टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार मारवाडी शेअर्स अँड फायनान्स लिमिटेडचे (Marwadi Shares and Finance Ltd) ​​जितेश राणावत सांगतात की, डेटामॅटिक्स ही कर्जमुक्त कंपनी आहे. त्यांनी आपली सहाय्यक कंपनी सिग्नेक्स (Cignex) यशस्वीपणे विकली आहे. ज्यामुळे त्यांना त्यांचा बीपीएम आणि एआय व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यात मदत होणार आहे.

Datamatics Global कंपनी कशी आहे?

गेल्या तिमाहीत कंपनीने आपला EBITDA मार्जिन आणि टॅक्स नंतरचा नफा (पीएटी) सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ज्यामुळे कंपनीला चांगले मूल्यमापन स्वरूपात फायदा झाला. मार्च 2021 पर्यंत कंपनीकडे 254 कोटी रुपये रोख आणि तरल गुंतवणूक आहे. तसेच, डिव्हिडंड पेआऊट पॉलिसी गुंतवणूकदारांसाठी चांगले काम करू शकते.

अलीकडेच कंपनीने जाहीर केले आहे की, Cybercom Group ABकडून Cybercom Datamatics Information Solutions मधील 49.50 टक्के भागभांडवल आता 30 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी एक किंवा अधिक टप्प्यात पूर्ण केले जाईल.