Multibagger Share | 1 लाखाचे झाले तब्बल अडीच कोटी! 'या' शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल

गेल्या दीड ते दोन वर्षांत शेअर बाजारातील अनेक शेअर्सने जबरदस्त परतावा दिला आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि शेअरच्या हालचालीची चाचणी घेणे आवश्यक आहे.

Updated: May 27, 2022, 07:58 AM IST
Multibagger Share | 1 लाखाचे झाले तब्बल अडीच कोटी! 'या' शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल title=
representative image

मुंबई : Multibagger Share:गेल्या दीड ते दोन वर्षांत शेअर बाजारातील अनेक शेअर्सने जबरदस्त परतावा दिला आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि शेअरच्या हालचालीची चाचणी घेणे आवश्यक आहे. असे अनेक पेनीस्टॉक आहेत ज्यांनी 2021 मध्ये बंपर परतावा दिला आहे. 

आज आम्ही तुम्हाला जो शेअर सांगणार आहोत, त्यांनी काही दिवसांत गुंतवणूक करणाऱ्यांना करोडपती बनवले आहे. जर तुम्ही या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली नसेल, तर काळजी करू नका, तरीही तुम्ही त्यात गुंतवणूक करू शकता. तज्ज्ञ अजूनही स्टॉकवर बुलिश आहेत.

हा शेअर SEL Manufacturing Companyचा आहे. या स्टॉकने गेल्या काही महिन्यांत भरपूर परतावा दिला आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने ऑक्टोबरमध्ये या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, आज त्याच्या शेअर्सची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेअरमध्ये घसरणीचा कल दिसून येत आहे.

एक लाख अडीच कोटी कसे झाले?

28 ऑक्टोबर 2021 रोजी, शेअरची किंमत NSE वर 4.95 रुपये होती. 26 मे 2022 रोजी बंद झालेल्या ट्रेडिंग सत्रात स्टॉक Rs 1181 वर बंद झाला आहे. 

7 महिन्यांत या स्टॉकने सुमारे 24 हजार टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच 28 ऑक्टोबर 2022 रोजी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवणाऱ्या व्यक्तीला 20,202 युनिट्स मिळाले असतील. 

आज या शेअरचे अनेक युनिट्स (20,202) वाढून सुमारे 2.4 कोटी झाले आहेत. म्हणजेच सुमारे अडीच कोटींचा परतावा फक्त 7 महिन्यात मिळाला.