अभिनेत्रीला गोळ्या घालणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा

अभिनेत्रीला घरात घुसून गोळा घालणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान, सुरक्षा दलाची मोठी कारवाई

Updated: May 27, 2022, 07:50 AM IST
अभिनेत्रीला गोळ्या घालणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा

मुंबई : अभिनेत्रीला घरात घुसून गोळ्या घालणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला मोठं यश आलं आहे. अभिनेत्रीची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आलं. अवघ्या 24 तासात ही कारवाई करण्यात आली. सुरक्षा दलाची ही सर्वात मोठी कारवाई आहे. 

टीव्ही कलाकार अमरीन भटची हत्या करण्यात आली होती. काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसात जैश-ए-मोहम्मदच्या 3 आणि लष्कर ए तोएबाच्या 8 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 

सुरक्षा दलाकडून एकूण 11 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. अवंतीपुरामध्ये गुरुवारी सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. 

शाहिद मुश्ताक भट आणि फरहान हबीब अशी दहशतवाद्यांची नावं असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक विजय कुमान यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमरीन भट सोशल मीडियावर स्टार होती. 

अमरीन भटचे टिकटॉकवरील व्हिडीओ खूप जास्त प्रसिद्ध होते. टिकटॉक बंद झाल्यानंतर ती सोशल मीडियावर आपले व्हिडीओ अपलोड करत होती. बुधवारी दहशतवाद्यांनी या अभिनेत्रीची हत्या केली.