Multibagger Stock:विक्रीच्या काळातही काही शेअरने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. असाच एक शेअर म्हणजे - Astral Limited होय. जो गेल्या काही वर्षांत रु. 2 वरून 1700 पर्यंत वाढला आहे. एस्ट्रल लिमिटेडचा शेअर या कालावधीत गुंतवणूकदारांना 70,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
Multibagger Stock:जागतिक बाजारातून मिळालेल्या संकेतांदरम्यान शेअर बाजारात विक्री झाली. पण या स्थितीतही काही स्टॉक जबरदस्त परतावा देत आहेत. असाच एक स्टॉक अॅस्ट्रल लिमिटेड ही प्लास्टिक उत्पादने बनवणारी कंपनी आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा परतावा दिला आहे.
या कंपनीचे स्टॉक अवघ्या काही वर्षांत 2 रुपयांवरून 1700 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत गुंतवणूकदारांना 70,000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. एवढेच नाही तर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 2,524.95 रुपये आहे, तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1,609.75 रुपये आहे.
1 लाख रुपयांचे झाले 8.8 कोटी
13 मार्च 2009 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर Astral Limited चे शेअर्स रु. 1.98 च्या पातळीवर होते, तर 3 जून 2022 रोजी NSE वर कंपनीचे शेअर्स रु. 1746 वर बंद झाले. म्हणजेच कंपनीच्या शेअरने 70,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला.
एखाद्या व्यक्तीने 13 मार्च 2009 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 8.81 कोटी रुपये झाले असते.
Astral Limited च्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षात 350 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मात्र, यावर्षी कंपनीचा परतावा फारसा चांगला नसून आतापर्यंत कंपनीच्या समभागांनी 25 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.