उत्कल एक्स्प्रेस अपघात प्रकरण: ४ रेल्वे अधिकारी निलंबित

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरजवळ झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वे प्रशासनाने कारवाई केली आहे. प्राथमिक चौकशीनंतर ४ रेल्वे अधिका-यांना निलंबित करण्यात आलं आहे. तीन अधिका-यांना सक्तीच्या रजेवरही पाठवण्यात आलं आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 20, 2017, 10:25 PM IST
उत्कल एक्स्प्रेस अपघात प्रकरण: ४ रेल्वे अधिकारी निलंबित title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरजवळ झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वे प्रशासनाने कारवाई केली आहे. प्राथमिक चौकशीनंतर ४ रेल्वे अधिका-यांना निलंबित करण्यात आलं आहे. तीन अधिका-यांना सक्तीच्या रजेवरही पाठवण्यात आलं आहे.

मुजफ्फरनगरपासून काही अंतरावर असलेल्या खतौलीजवळ उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे शनिवारी घसरले. या भीषण अपघातात २३ प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली. 

या अपघातानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी चौकशीचे आदेश दिले होते. तसेच उत्कल एक्स्प्रेसच्या अपघाताला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे म्हटले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

नॉर्दन रेल्वे जीएम आर. एन. कुलश्रेष्ठ, दिल्ली विभागाचे डीआरएम आणि रेल्वे बोर्डाच्या इंजिनियरींग बोर्डाचे सदस्य अशा तिघांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.