नवी दिल्ली : एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्विन लोहानी यांची रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए के मित्तल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अश्विन लोहनी यांची निवड करण्यात आली आहे.
मंत्रिंडळाकडून नियूक्त करण्यात आलेल्या समितीने हा निर्णय जाहीर करण्यात आला. बुधवारी झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्री प्रभू यांनी देऊ केलेल्या राजीनाम्याच्या घटनेनंतर काही वेळातच ही घोषणा करण्यात आली. समितीने म्हटले आहे की, या नव्या नियूक्ती बाबतचे सर्व माहिती रेल्वे मंत्रालयाला देण्यात आलेली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्तल यांनी आपला राजीनामा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे मंगळवारी सोपवला होता. मात्र, प्रभू यांनी तो बुधवारी सकाळी स्विकारला.
दरम्यान, लोहनी यांनी यापूर्वी भारतीय रेल्वेत विवीध पदांवर सेवा केली आहे. ते भारतीय रेल्वे स्टोअर्स सेवेचे १९७६च्या बॅचचे अधिकारी आहेत. २०१६मध्ये सेवेतून निवृत्त होण्याच्या दोन दिवस आधी त्यांना पुन्हा एकदा त्याच पदावर नियूक्त करण्यात आले होते. दोन वर्षांसाठी त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला होता.