National Cinema Day : 'या' तारखेला फक्त 75 रुपयात पाहता येणार सिनेमा

Amazon, Flipkart वरचं नाही तर चित्रपटगृहातही बंपर सेल, फक्त 75 रुपयात पाहता येणार कोणताही सिनेमा 

Updated: Sep 22, 2022, 01:25 PM IST
 National Cinema Day : 'या' तारखेला फक्त 75 रुपयात पाहता येणार सिनेमा  title=

मुंबई : देशभरात अ‍ॅमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट (Flipkart) साऱख्या ऑनलाईन साईटसवर ऑफर सुरु असताना, आता सिनेमागृहात मोठा बंपर सेल सुरु झाला आहे. फक्त 75 रूपयात सिनेमा पाहता येणार आहे. त्यामुळे सिनेप्रेमींसाठी ही मोठी बातमी आहे. मात्र इतक्या कमी किंमतीत का सिनेमा दाखवले जात आहेत? यामागचे कारण जाणून घेऊयात. (national cinema day on 23 september movie tickets are being sold for rupess 75 multiplex association of india dhokha round d corner chup)  

तिकिटाची रक्कम इतकी कमी का? 
उद्या 23 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन (National Cinema Day) साजरा होत आहे. त्यानिमित्ताने प्रेक्षकांना भेटवस्तू देण्यासाठी चित्रपटांच्या तिकिटांची (Movie Tickets) किंमत केवळ 75 रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता 300 ते 1000 रुपयांचे तिकीट काढून चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना आता अवघ्या 75 रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे.

'या' चित्रपटगृहात ऑफर 
उद्या 23 सप्टेंबर रोजी देशातील 4000 सिनेमागृहांमध्ये कोणताही चित्रपट अवघ्या 75 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. त्यात आता उद्या दोन चित्रपट रिलीज होणार आहेत. आर माधवनचा 'धोका राऊंड डी कॉर्नर' (Dhokha Round D Corner) हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अपारशक्ती खुराना, दर्शन कुमार आणि खुशाली कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर दुसरा चित्रपट चुप (Chup) हा रिलीज होत आहे. या चित्रपटात सनी देओल, पूजा भट्ट, श्रेया धनवंतरी, आणि सरन्या पोनवन्नन हे कलाकार आहेत. 

तारखेत बदल 
दरम्यान यापूर्वी 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन (National Cinema Day) साजरा करण्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र नंतर 23 सप्टेंबर रोजी घोषित करण्यात आली. त्यामुळे आता फक्त 75 रूपयात प्रेक्षकांना त्यांचा आवडता चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये पाहता येणार आहे.  

मल्टिप्लेक्स असोसिएशनचे म्हणणे काय? 

मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने (Multiplex Association Of India) राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त (National Cinema Day) ट्विट केले आहे की, भारताच्या पहिल्या 'राष्ट्रीय चित्रपट दिना'च्या निमित्ताने, आम्ही तुम्हाला आठवण करून देऊ इच्छित आहोत की, या शुक्रवारी तुम्हाला चित्रपटगृहात फक्त 75 रुपयांमध्ये चित्रपटांचा आनंद घेणार आहे. त्यामुळे चला 23 सप्टेंबर 2022 रोजी चित्रपटांची जादू साजरी करूया,असे आवाहन त्यांनी केले आहे. 

दरम्यान बॉलिवूड (Bollywood) गेल्या अनेक दिवसांपासून बॉयकॉटचा (Boycott) सामना करत आहे. या बॉयकॉट ट्रेंडचा फटका चित्रपटाच्या कमाईवर झाला आहे. त्यामुळे मोठे-मोठे सिनेमे बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करू शकले नाहीत आहेत. प्रेक्षक सिनेमागृहापर्यंत जातचं नाही आहे,असाही एक अहवाल समोर आला आहे. त्यामुळे आता मल्टिप्लेक्स असोसिएशनची ही ऑफर पुन्हा सिनेमागृहांशी प्रेक्षक जोडते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.