राजकुमारावर जडलं होतं Lata Mangeshkar यांचं प्रेम, लग्न करायचं होतं पण...; नात्याचा शेवट डोळ्यात पाणी आणणारा

Lata Mangeshkar Birth Anniversary 2024 : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कधीच लग्न केलं नाही. पण तुम्हाला माहितीय त्या एका राजकुमाराच्या प्रेमात होत्या. लतादीदी आणि राजकुमार हे एकमेकांसाठी आजीवन अविवाहित राहिले. 

नेहा चौधरी | Updated: Sep 28, 2024, 02:00 PM IST
राजकुमारावर जडलं होतं Lata Mangeshkar यांचं प्रेम, लग्न करायचं होतं पण...; नात्याचा शेवट डोळ्यात पाणी आणणारा title=
Lata Mangeshkar was in love with Rajkumar raj singh of dungarpur wanted to get married but lata mangeshkar birth anniversary

Lata Mangeshkar Birth Anniversary 2024 : गानसम्राज्ञी आणि  शास्त्रीय गायक पं दीनानाथ मंगेशकर यांच्या ज्येष्ठ कन्या लता मंगेशकर आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत. लतादीदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर झाला होता. आठ दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत त्यांनी 36 भाषांमध्ये 50,000 हून अधिक गाणी गायली आहेत. पण त्यांनी कधीही लग्न केलं नाही. लतादीदी यांनी कधीही लग्न का केलं नाही, त्यांचं कोणावर प्रेम होतं असे प्रश्न आजही चाहत्यांना पडतात. (Lata Mageshkar Love Story)

नात्याचा शेवट डोळ्यात पाणी आणणारा!

रिपोर्ट्सनुसार, लता मंगेशकर या डुंगरपूर राजघराण्यातील महाराजा राज सिंह (Maharaja Raj Singh) यांच्यावर प्रेम करत होत्या. महाराजा राज सिंह हे लतादीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांचे मित्र होते. हे नातं प्रेम पूर्ण झालं असतं तर लतादीदी गानसम्राज्ञीसोबत महाराणीदेखील असत्या. पण त्यांचं प्रेम अपूर्ण राहिलं. महाराजा राज सिंह यांनाही लता यांच्यासोबत लग्न करायचं होतं. पण त्या एका वचनामुळे त्यांना हे लग्न करता आलं नाही. 

राज सिंग यांनी त्यांच्या आई-वडिलांना वचन दिले होते की, ते कोणत्याही सामान्य कुटुंबातील मुलीशी लग्न करणार नाही. बस मग काय पण राजा सिंह यांनी कधीही लग्न केलं नाही. महाराजा राज सिंह शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या आई-वडिलांच्या जवळ राहिले आणि दिलेल्या वचनाचे पालन करत राहिले. लता दीदी आणि राजा सिंह हे दोघे आजीवन एकमेकांवर प्रेम करत राहिले. त्यांनी कोणाशीही लग्न केलं नाही. 

महाराजा राज सिंह यांना क्रिकेटची आवड होती. ते जवळपास 16 वर्षे फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले. यानंतर महाराजा राज सिंह 20 वर्षे भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) शी जोडलेले होते. दोन टर्म मध्ये नॅशनल टीमसाठी सिलेक्टर म्हणून काम केले होते आणि भारतीय संघाचे चार वेळा फॉरेन्ट मॅनेजमेंट केले. दरम्यान, विकीपिडियानं दिलेल्या वृत्तानुसार ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य देखील होते.