INS विक्रमादित्यवर पहिल्यांदाच उतरलं स्वदेशी नेव्हल लाइट कॉम्बॅट एअरक्राप्ट

अरेस्टिर लँडिंग म्हणजे काय? जाणून घ्या... 

Updated: Jan 11, 2020, 04:21 PM IST
INS विक्रमादित्यवर पहिल्यांदाच उतरलं स्वदेशी नेव्हल लाइट कॉम्बॅट एअरक्राप्ट  title=

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच नेव्हल लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस आज विमानवाहक युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य (INS Vikramaditya) वर उतरण्यात यशस्वी झालंय. एखादं स्वदेशी लढावू विमान एखाद्या युद्धनौकेवर उतरण्याची ही पहिलीच घटना... सैन्यातील सूत्रांकडून ही माहिती देण्यात आलीय. 

समुद्र आधारित परीक्षण केंद्रावर व्यापक परीक्षण पूर्ण केल्यानंतर डीआरडीओ, एडीएद्वारे विकसीत एलसीए नेव्हीनं INS विक्रमादित्यवर शनिवारी सकाळी १०.०२ वाजता यशस्वी लँडिंग केलंय. कमोडोर जयदीप मावळकर यांनी हे लँडिंग यशस्वी केलंय. 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) द्वारे विकसित करण्यात आलेलं लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट 'अरेस्टर वायर'च्या मदतीनं INS विक्रमादित्यवर उतरलं. एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी नौसेनेसोबत मिळून लढाऊ एअरक्राफ्ट विकसीत करत आहे. 

अरेस्टिर लँडिंग म्हणजे काय

अरेस्टिंग गिअरच्या सहाय्यानं एखादं लढावू विमान छोट्या रनवेप्रमाणे विमानवाहक जहाजावर सहजगत्या लँड केलं जाऊ शकतं. याच्या यशस्वी परीक्षणानंतर आता 'एलसीए तेजस'च्या नेव्हल व्हर्जनला विक्रमादित्य या युद्धनौकेवर तैनात केलं जाऊ शकेल. याशिवाय एलसीए तेजसचं नेव्हल व्हर्जन भारताच्या पुढच्या विमानवाहू युद्धनौका असलेल्या INS विक्रांतवरही तैनात केलं जाऊ शकेल.