छत्तीसगढ : विजापूर (Chhattisgarh) येथे झालेल्या नक्षलवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबारात सुरक्षा दलाचे 22 पेक्षा अधिक जवान शहीद झाले. तर दोन डझनहून अधिक सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. अशातच सीआरपीएफमधील बेपत्ता जवान राकेश्वरसिंग मनहास संदर्भात एक बातमी समोर आली होती की, राकेश्वरसिंग हा नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे. त्यानंतर मात्र त्याची कोणतीच बातमी समोर आली नाही. त्यामुळे त्याच्या सोबत नक्की काय झाले असावे? अशा विचार सगळे करत होते. राकेश्वरसिंगच्या घरच्यांची रडून रडून वाईट अवस्था झाली होती. अशातच एक बातमी समोर आली ती म्हणजे, राकेश्वरसिंग हा जिवंत आहे.
सीआरपीएफ कमांडो राकेश्वर सिंगचा फोटो प्रसिद्ध करून जवान सुरक्षित असल्याचा दावा नक्षलवाद्यांनी केला आहे. यापूर्वी नक्षलवाद्यांनी लपट जवान त्यांच्या ताब्यात असल्याचे पत्र काही स्थानिक माध्यमांना दिले होते.
छत्तीसगडमधील स्थानिक पत्रकार गणेश मिश्रा यांनीही राकेश्वरसिंग मनहास या जनानाबद्दल मोठा खुलासा केला आहे. राकेश्वरसिंग हा नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एएनआयशी (ANI) बोलताना गणेश मिश्रा यांनी सांगितले की, "मला नक्षलवाद्यांचे दोन फोन आले होते त्यात त्यांनी मला सांगितले की एक जवान त्यांच्या ताब्यात आहे. त्या जवानाना गोळी लागली आहे, त्यामुळे त्याला वैद्यकीय उपचार देण्यात आले आहे." पुढे गणेश मिश्रा म्हणाले की, नक्षलवाद्यांनी त्यांना सांगितले की, 'जवानाला 2 दिवसात सोडण्यात येणार आहे आणि जवानाचा व्हिडिओ आणि फोटो लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल.'
I received two calls from Naxals that one jawan is in their custody. They said the jawan received bullet injury&was given medical treatment,& he'll be released in 2 days. They said a video&photo of jawan to be released soon: Ganesh Mishra, a journalist from Bijapur, Chhattisgarh pic.twitter.com/2lXRNnfggX
— ANI (@ANI) April 7, 2021
राकेश्वरसिंग मनहास 2011 साली सीआरपीएफमध्ये दाखल झाला होता. त्याची तीन महिन्यांपूर्वी छत्तीसगडमध्ये पोस्टींग झाली होती. राकेश्वरसिंहचे 7 वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना एक 5 वर्षांची मुलगी आहे. राकेश्वरसिंग ची आई कुंती देवी आणि पत्नी मीनू यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे राकेश्वरला नक्षलवाद्यांकडून सोडवूण आणण्याची मागणी केली आहे.