पंतप्रधानांसोबत तो मुस्लिम तरुण कोण? त्यांच्यात काय बोलणे झाले असावे?

सोशल मीडियावरती सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी आणि एक मुस्लीम तरूण काही तरी बोलताना दिसत आहे.

Updated: Apr 7, 2021, 06:27 PM IST
पंतप्रधानांसोबत तो मुस्लिम तरुण कोण? त्यांच्यात काय बोलणे झाले असावे?

मुंबई : सोशल मीडियावरती सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी आणि एक मुस्लीम तरूण काही तरी बोलताना दिसत आहे. त्यामुळे हा तरूण नक्की कोण? ते दोघे काय बरे बोलत असावे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.  सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकं याबद्दल कमेंन्ट्स करुन विचारत आहेत की, पंतप्रधान मोदी आणि त्या तरूणामध्ये नक्की काय संवाद झाला असावा?

हा फोटो 3 एप्रिल 2021 च्या बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यानचा आहे. एका मीडिया अहवालानुसार असे समोर आले की, त्या तरूणाचे नाव जुल्फिकार अली असे आहे. जेव्हा पंतप्रधान मोदी यांचा ब्रिगेडमध्ये कार्यक्रम झाला, तेव्हा तेथे पार्किंगची जबाबदारी जुल्फिकारकडे होती.

जेव्हा जुल्फिकार त्या कार्यक्रमात पोहोचला तेव्हा त्याला एसपीजीने (Special Protection Group)  कोव्हिड-19 मुळे काही गोष्टींची अट घातली होती. जुल्फिकारची त्यावेळेस कोव्हिड चाचणी देखील करण्यात आली होती.

जेव्हा पंतप्रधान मोदींचे आगमन होणार होते तेव्हा जुल्फिकार त्यांच्या हेलिपॅडजवळ उभा होतो. जुल्फिकार तसा मोदींचा चाहाता होता. त्यामुळे मोदींना दुरुन का होईना भेटायला मिळणार या विचाराने तो खूप आनंदी होता.

जेव्हा पंतप्रधान मोदी यांचे आगमन झाले, तेव्हा त्यांना सगळ्यांनी नमस्कार केला. जुल्फिकारने देखील त्यांना सलाम केला. त्यावेळेस पंतप्रधानांनी आपल्या पद्धतीने त्याला सलाम केला. पंतप्रधानांनी आपल्याला ओळख दाखवली हेच जुल्फिकारसाठी खूप होते. तो फार आनंदी झाला. परंतु जुल्फिकारचा आनंद तेव्ढ्या पुरताच नव्हता तर त्याला आनखी एक आनंदाचा धक्का मिळणार होता.

पंतप्रधान मोदी जेव्हा त्यांच्या गाडीतून उतरले तेव्हा त्यांनी जुल्फिकारला त्याचे नाव विचारले. त्याने पंतप्रधानांना आपले नाव सांगितले परंतु हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे त्यांना नाव ऎकू आले नाही. त्यामुळे मग थोडे जवळ येऊन त्यांनी पुन्हा विचारले. त्यांनंतर पंतप्रधान मोदी यांनी जुल्फिकारच्या खांद्यावर हात ठेऊन तुला काय बनायचे आहे? असे विचारले.

तेव्हा त्याने मला केवळ राष्ट्राच्याहितासाठी काम करायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर पंतप्रधानांनी त्याला पुन्हा विचारले की, तुझी काय इच्छा आहे. तेव्हा जुल्फिकारने त्यांना सांगितले की, मला तुमच्या सोबत फोटो काढायचे आहे. त्याने मोबाईलसाठी खिशात हात घातला, तेव्हड्यात मोदींनी त्यांच्या फोटोग्राफरला खूनावले. तेव्हा ते दृष्य पंतप्रधानांच्या फोटोग्राफरने टिपले होते. त्यानंतर पंतप्रधानांनी जुल्फिकारला म्हंटले की, आपली पुन्हा भेट होईल आणि ते निघून गेले.