नवी दिल्ली : 2019 लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये एनडीएचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला तयार झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बिहारमध्ये भाजप 20 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू 12 जागांवर निवडणूक लढवणार आहे. राम विलास पासवान यांचा पक्ष एलजेपीला एनडीएच्या कोट्यातून 5 जागा तर कुशवाहा यांच्या आरएलएसपी पक्षाला 2 जागा देण्य़ात आल्य़ा आहेत.
आरएलएसपीमधून निलंबित खासदार अरुण कुमार हे देखील एनडीएमधूनच निवडणूक लढवणार आहेत. जेडीयूला झारखंड आणि बिहारमध्ये एनडीएकडून 1-1 जागा देण्यात आली आहे. बिहारमध्ये भाजपच मोठ्य़ा भावाच्या भूमिकेत असणार आहे.
लोकसभा निवडणुकीत एकीकडे विरोधक महाआघाडीची चर्चा करत असताना भाजपने आपल्या मित्र पक्षांसोबत निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. बिहारमधून याची सुरुवात झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जेडीयूचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक करुन जागा वाटपाचा निर्णय घेतला आहे.