शुक्रवारी आलेल्या भूकंपानंतर नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले. नेशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे भारतात त्याचे हादरे जाणवले नाहीत. पान शुक्रवारच्या भूकंपाची दाहकता आणि त्यामुळे झालेली जीवित, वित्तहानी पाहता या भूकंपामुळेही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळाल. यावेळी फक्त नेपाळच नव्हे तर अफगाणिस्तानमध्येहीही कंपन जाणवली.
अफगाणिस्तानच्या फैजाबाद येथे शनिवारी रात्री उशिरा भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.५ इतकी सांगण्यात आली. मागील दोन महिन्यांमध्ये पाकिस्तान, नेपाळ, भारतासह शेजारी राष्ट्रांमध्येही बऱ्याचदा भूकंपाचे हादरे जाणवले. ज्यामुळे भारतीय उपखंडामध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
An Earthquake of Magnitude 3.6 strikes 169km NW of Kathmandu, Nepal: National Center for Seismology pic.twitter.com/fGhY5RvCdC
— ANI (@ANI) November 4, 2023
शुक्रवारी नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाने १५७ निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. अधिकृत आकडेवारीनुसार या आपत्तीमध्ये ३५७ नागरिक जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.
शुक्रवारी नेपाळमध्ये आलेल्या या भूकंपामुळे संशोधकांनाही विचार करायला भाग पाडलं. निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार पृथ्वीच्या पृष्टापासून साधारण ५०० वर्षांपासून अतिप्रचंड स्वरुपात ऊर्जा निर्माण होत आहे. परिणामी येत्या काळात इथं आणखी महाभयंकर भूकंप येऊ शकतो ज्याची तीव्रता ८ रिश्टर स्केल इतकी असू शकते.
देशावर आलेलं हे संकट पाहता नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी या महाभयंकर भूकंपानंतर बचावकार्यासाठी तीन सुरक्षा संस्थांना तैनात केल्याची माहिती मिळत आहे. नेपाळमधील भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की, दिल्ली आणि उत्तर भारतातही हादरे जाणवले. दिल्ली एनसीआरमध्ये अचानकच भूकंप जाणवल्यानं उंच इमारतींपासून बंगल्यांमध्ये राहणारी मंडळीसुद्धा गोंधळल्याचं पाहायला मिळालं. मागील दोन महिन्यांमध्ये दिल्लीमध्ये असे धरणीकंप जाणवण्याची ही दुसरी वेळ.