SBI ची ग्राहकांना सूचना ; करु नका हे काम

देशातील सर्वात मोठ्या बॅंकेने म्हणजे एसबीआयने (SBI)आपल्या ग्राहकांसाठी एक सूचना जाहिर केली आहे. 

Updated: Mar 22, 2018, 01:54 PM IST
SBI ची ग्राहकांना सूचना ; करु नका हे काम title=

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या बॅंकेने म्हणजे एसबीआयने (SBI)आपल्या ग्राहकांसाठी एक सूचना जाहिर केली आहे. जर तुम्ही एसबीआयशिवाय अन्य बॅंकांचेही युजर्स असाल तर बॅंकेतर्फे जाहिर केलेले अॅडव्हायजरी तुमच्या कामाची आहे. ही अॅडव्हायजरी डिजिटल ट्रांजेक्शनसाठी जाहिर केली आहे. डिजिटल ट्रांजेक्शन सुरु झाल्यानंतर देवाण घेवाण खूप सोपी झाली आहे. मात्र त्याचे धोकेही वाढले आहेत. डिजिटल ट्रांजेक्शनमुळे तुम्ही कोणालाही एका मिनिटात पैसे पाठवू शकता. पण हा व्यवहार करताना तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे.

गैरव्यवहार वाढत आहेत

डिजिटल ट्रांजेक्शनमध्ये होणारे घोटाळे, गैरव्यवहार यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बॅंकेकडून वेळोवेळी ग्राहकांना मेसेज पाठवून आपली गोपनीय माहिती कोणासोबतही शेअर करू नका, असे सांगितले जाते. एसबीआयनेही ऑनलाईन होणारे गैरव्यवहारापासून सुरक्षित राहण्यासाठी सूचना देण्यात आली आहे. पण बॅँकेच्या या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला नुकसानाला सामोरे जावे लागेल.

ऑफिशियल अकाऊंटवरुन ट्वीट

एसबीआयने ऑफिशियल अकाऊंटवरुन ट्वीट करुन ही सूचना दिली आहे. अनोळखी व्यक्तीला अकाऊंट नंबर देवून पैसे ट्रान्सफर करण्यास सांगू नका. यामुळे तुमचे अकाऊंट धोक्यात येईल.

sbi, sbi alert, sbi alert to customers, digital transaction, एसबीआई